Maharashtraआपला जिल्हा
आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणी टिप्परची समोरा-समोर धडक- श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी व मुलगा यांचा जागीच कारमध्ये होरपळून मृत्यू.

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)
आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन आई आणि मुलाचा कार मध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला.हा अपघात इतका भीषण होता काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.आष्टी पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर काळाने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार,ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने
आष्टीकडून बीडकडे जात असताना कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली असून या भीषण धडकेत कारने लगेच पेट घेतला, आणि या कारमधून आई आणि मुलाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार,ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने


