खेळमहाराष्ट्र ग्रामीण

आय.एम विनर राज्यस्तरीय २०२६ स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर-धानोरा जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा.

आय.एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत कु.आर्या काळे जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर-कु.अनन्या लोहार तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक-सर्व स्तरातून या विद्यार्थिनींचे कौतुक करत अभिनंदनचा वर्षाव.

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)

आय.एम विनर राज्यस्तरीय २०२६ स्पर्धा परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते.या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून या मध्ये आष्टी (जिल्हा बीड) तालुक्यातील मौजे धानोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु.आर्या प्रवीण काळे हिने यश संपादन करीत बीड जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला तर,कु.अनन्या महेश लोहार या विद्यार्थिनीने आष्टी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थिनींनी यश संपादन करुन धानोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच नाव उंचावून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला.

या यशस्वी विद्यार्थिनींना आय.एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक व केंद्र प्रमुख मयूर संतोष थोरवे(सर)मुख्याध्यापक श्री सुनील तरटे सर,सर्व शिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्र संचालक मयूर संतोष थोरवे(सर)मुख्याध्यापक श्री. सुनील तरटे सर,शिक्षिका,पालक वर्ग,मित्रपरिवार व सर्व स्तरातून कौतुक करत अभिनंदनचा वर्षाव होत आहे .

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!