(मुंबई)दिं.९ प्रतिनिधी,नागेश मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातील एकूण निधी पैकी अनुसूचित जाती करीता १५ टक्के निधी ठेवण्याच्या २१ जून १९७९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी,अनुसूचित जातीचा अर्थसंकल्पातील निधी इतरत्र कुठेही वळवू नये यासाठी कायदा करावा, अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना(फ्रि शिप), शिष्यवृत्ती योजना(स्कौलरशिप)पी.एच. डी विद्यार्थ्यांना फेलोशिप,परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेकरीता रु आठ लाख उत्पन्नाची मर्यादा रद्द करावी, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, शासकीय नोकरीतील अनुसूचित जाती जमातींचा अनुशेष भरून काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे, अनुसूचित जाती जमातींच्या कर्मचारी अधिकारी यांना पदोन्नतीतील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून सुरू करावे,कंत्राटी पद्धतीने कामगारांच्या भरतीमध्ये आरक्षण धोरण लागू करणे,खाजगी क्षेत्रात आरक्षण धोरण लागू करणे,अनुसूचित जाती जमातींच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे,महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे,तसेच ज्या माजी आमदार,खासदार यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची पेन्शन बंद करावी त्यांना क्रिमिलेयर लावण्यात यावे,मुंढवा येथील महार वतनी जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,गैरहस्तांतर झालेल्या महार वतनी जमीनी मुळ वतनदारांना परत कराव्यात,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी,घरकुल योजनेच्या निधीत शहरी व ग्रामीण असा भेद न करता दुप्पट वाढ करावी, अतिक्रमित रहिवाशांना जागेचे मालकी पट्टे देण्यात यावेत,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविकांना,कोतवालांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा.

सर्व महामंडळाच्या,प्राधिकरणाच्या कर्मचारी अधिकारी यांना शासकीय जूनी पेन्शन योजना लागू करावी,महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सन १९४९ चा कायदा रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी,मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठीची युजीसीची सन २०२५ नियमावली लागू करणेसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी आदी विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा)महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे दि ११ मार्च २०२६ रोजी दुपारी १२-००वा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे ह्या धडक मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा)राष्ट्रीय अध्यक्ष मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे हे करणार आहेत ह्या मोर्चाला डॉ.देवेश कांबळे,जीवन बागडे,प्रा.अशोक ढोले,सी पी रामटेके,भिमराव चौरे,प्रेम गजभिये, सुरेश दहिकर,एड दिलीप घरडे,दिगंबर वाकोडे,मनोहर भिडे,नानासाहेब देशमुख, प्रकाश तारु,संजीवकुमार इखारे, बाळासाहेब ढबाले,शत्रुघ्न कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती “प्रवासी संचार”च्या प्रतिनिधीला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे व मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांनी दिली आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!