आपला जिल्हा

शिरूर कासार तालुक्यातील जाटनांदूर येथील बालाघाट विद्यालयामध्ये सुट्टीच्या दिवशी रंगला विज्ञान प्रयोगाचा आविष्कार.

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली विज्ञान प्रयोग परीक्षा--! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम---!

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)

रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी शिरूर कासार तालुक्यातील जाटनांदूर येथील बालाघाट विद्यालयांमध्ये विशेष विज्ञान प्रयोग परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या विज्ञान उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे धैर्य आणि मनोबल वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न या विद्यालयातील शिक्षकांनी केल्याची या ठिकाणी दिसून आले आहे.

या विज्ञान प्रयोग कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.राम महाराज डोंगर यांची विशेष आवर्जून उपस्थिती लाभली असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाटनांदूर येथील प्रथम नागरिक तथा विद्यमान सरपंच सचिन(भाऊ )माने हे होते.मान्यवरांचा मांदियाळीत रंगला विज्ञान प्रयोगाचा सोहळा.

या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुका प्रमुख सोपान(काका)मोरे,माजी पंचायत समिती सभापती तथा चेअरमन बबन(दादा)चौधरी,माजी पंचायत समिती सदस्य सुंदर(बापू)जेधे,तुषार(भाऊ)चव्हाण,संतोष(भाऊ)भोसले यांच्यासह आदी जाटनांदूर पंचक्रोशीतील सर्व स्तरातील अनेक आजी/माजी पदाधिकारी,अधिकारी आणि नेते मंडळी आवर्जून उपस्थित होती.

जाटनांदूर येथील बालाघाट विद्यालयातील उपक्रमाचा उद्देश आणि स्वरूप स्पर्धा परीक्षेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नयेत,व केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान शिकवण्यावर शिक्षकांनी उत्कृष्ट भर दिल्याचे या ठिकानी दिसून आले असून रविवारी सुट्टी असतानाही शिक्षकांनी घेतलेल्या या परिश्रमांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकल्याचे जाटनांदूर येथील बालाघाट विद्यालयांमध्ये विज्ञान प्रयोग परीक्षा दरम्यान दिसून आले.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!