(Beed)परळी,ता.२०-प्रतिनिधी-गोरख मोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
बीड जिल्ह्यातील परळी येथून महसूल प्रशासनाला हादरवून सोडणारी एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)आपल्या जाळ्यात ओढले असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.भ्रष्टाचाराच्या या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि विशेषतः परळी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार, तहसीलदार मुंडे यांना ताब्यात घेऊन एसीबीचे पथक पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बीडच्या दिशेने रवाना झाले आहे.या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,काही दिवसांपूर्वी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात एका नागरिकाने अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराला त्यांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र(सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट) काढायचे होते.हे महत्त्वाचे प्रमाणपत्र जारी करून देण्यासाठी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडून सुरुवातीला तब्बल ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.या बेकायदेशीर मागणीला कंटाळून संबंधित व्यक्तीने थेट एसीबीकडे धाव घेत दाद मागितली.

या गंभीर तक्रारीची त्वरित दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या प्रकरणाची अत्यंत गोपनीय पद्धतीने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोड होऊन५०हजार रुपयांऐवजी२०हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले.या माहितीच्या आधारे एसीबीच्या पथकाने तहसीलदार मुंडे यांना रंगेहात पकडण्यासाठी एक गुप्त सापळा रचला.मात्र,ज्यावेळी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारण्याची वेळ आली,तेव्हा तक्रारदाराच्या हालचालींवरून तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना काहीसा संशय आला.त्यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगत प्रत्यक्ष स्वतःच्या हातात पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली.असे असले तरी,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत शिताफीने या प्रकरणातील सर्व आवश्यक आणि ठोस पुरावे आधीच गोळा केले आहेत.या पुराव्यांच्या आधारे आता तहसीलदार मुंडे यांच्यावर कायदेशीर कारवाईचा फास आवळला गेला आहे.

सध्या परळीच्या तहसीलदारांवर रीतसर गुन्हा दाखल करण्याची अधिकृत प्रक्रिया वेगाने सुरू असून या घटनेचा पुढील सखोल तपास बीड एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. महसूल विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेच अशा प्रकारे लाच मागितल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून,भ्रष्ट अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!