संपादकीय
मुंबईत आठ आंबेडकरी पक्ष महापालिका निवडणुकीच्या रिंगणात होते.मात्र यातील एकाही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.मुंबईत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईने ११ एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांचे वंचित बहुजन आघाडीने ४५,मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने ७८,आनंदराव आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेनेने ५,प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने २,चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद पार्टीने १६,डॉक्टर सुरेश माने यांच्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने ५आणि रिपाई खोरीप गटाने १अशा १६४जागा लढवल्या होत्या.

एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने राज्यभरात ६६१ जागा लढवल्या होत्या.नांदेड मुंबई आणि लातूरमध्ये काँग्रेस बरोबर तर कोल्हापूरात आम आदमी पक्षाशी आघाडी होती.या आठ आंबेडकरी पक्षांपैकी लातूर ५,नांदेड ५,छत्रपती संभाजी महाराज ४,अकोला ५, उल्हासनगर २ अमरावती १ आणि चंद्रपूर ८अशा ३० जागा वंचित ने जिंकल्या आहेत.(दै.लोकसत्ता दि.१७.१.२०२५).

उपलब्ध माहितीनुसार बसपाला राज्यात ६ ठिकाणी यश मिळाले असल्याचे दिसून येते.२०१७ च्या तुलनेत बसपाला कमी जागा मिळाल्याचे दिसून आले आहे. उत्तरप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही बसपाची घसरण सुरू झाली की काय असे चित्र दिसून येत आहे.‘तुला नाही,मला नाही घाल,कुत्र्याला’ या म्हणीप्रमाणे आंबेडकरी पक्षांची गत झाली आहे.

एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात ३० जागांवर विजय मिळवला असला तरी मुंबई काँग्रेस बरोबर आघाडीत ४५ जागा लढवून एकही जागा मिळाली नाही.ह्यावरून वंचितची मते काँग्रेसला मिळाली,पण काँग्रेसची मते मात्र वंचितला मिळाली नाहीत,ही बाब अधोरेखित झाली आहे.मागे बसपाने उत्तरप्रदेशात काॅंगेसशी युती केली होती,पण काॅंग्रेसची मते आंबेडकरी पक्षाला मिळत नाहीत,याचा अनुभव त्यावेळी आला होता.म्हणून यापुढे काॅंग्रेसशी युती करण्यापेक्षा आंबेडकरी प्रमुख आठ पक्षांनी आघाडी तयार करून येणाऱ्या निवडणुका लढविल्या पाहिजेत ही काळाची गरज बनली आहे.याचा विचार आंबेडकरी पक्षांनी व अनुयायांनी करणे अगत्याचे आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!