वृत्तांकन:-राजेंद्र गवळी,मुख्याध्यापक-महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय उल्हासनगर ५.
आज दिनांक३जानेवारी,२०२६ रोजी सकाळी१०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.शाळेने दिनांक ३१डिसेंबर ते२जानेवारी या कालावधीत इयत्ता१ली ते१० वीच्या विद्यार्थी मुले व मुली यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते..त्यामध्ये निबंध,वक्तृत्व,चित्रकला,हस्ताक्षर,रांगोळी व वेशभूषा या विषयांचा समावेश होता..या स्पर्धांमधून प्राविण्य,विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध गुणदर्शन समारंभ दिनांक३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मान्यवर प्रमुख अतिथी,संस्था पदाधिकारी,पालक व विद्यार्थी वृंद यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला..यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांची पाहुणे व पालकांना मंत्रमुग्ध केले..माध्यमिक च्या मुलामुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनावर १८४८,भिडे वाड्यात शाळा सुरू करताना झालेला त्रास व मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याचे सुंदर नाटक सादर केले,सावित्रीबाईंच्या जीवनावर सुंदर,गाणी,भाषणे,वेशभूषा सादर करण्यात आले..आखीव रेखीव पद्धतीने सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक सर्वच मान्यवरांनी केले..या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हिल लाईन पोलिस स्टेशन च्या पोलिस अधिकारी श्रीम.सूर्यवंशी मॅडम,गोपनीय शाखेचे पोलिस अधिकारी श्री.गीते सर,मानव सेवा ट्रस्टचे श्री.स्वप्नील शिरसाठ तसेच समता दूत श्री.लोकेश कांबळे उपस्थित होते.
पोलिस अधिकारी सन्मा.सूर्यवंशी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले तसेच संस्थेचे व शिक्षकांचेही कौतुक केले..त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्र व ट्रॉफी चे वाटप करण्यात आले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.ए.वाय.जाधव सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर संस्थेचे सचिव श्री. जे.के.जावळे साहेब यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यक श्री. राजेंद्र गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री वाव्हळे सर यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाचे श्री.बोडखे सर व प्राथमिक विभागाच्या सौ.सीमा जगधने-सदाफुले यांनी खुमासदारपणे केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळांचे शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी वृंद यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचा समारोप पोलिस स्थापना दिवस साजरा करून व मुलांना खाऊचे वाटप करून करण्यात आला.