Maharashtraआपला जिल्हा
Trending
सांगलीत एस.टी.च्या सेवानिवृत्त संघटनेची सभा संप्पन्न.
रत्नपाल जाधव-राज्य प्रसिद्धी सचिव.

(सांगली)दिं.१३प्रतिनिधी-रफिक शेख“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
*पेन्शन समितीचा विस्तार करुन तज्ञ लोकांना घेणार असा ठराव एकमताने मंजुर*
*वर्षभराचा पास सर्वप्रकारच्या गाड्यांमध्ये मंजुर करुन घेण्याची सरचिटणीस सदानंद विचारे यांची ग्वाही*
सांगली एस.टी च्या सेवानिवृत्तांची एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या राज्य परिवहन निवृत्त संघटनेच्या उच्चाधिकार समिती,पेन्शन कमिटी आणी केंद्रिय कार्यकारिणीची सभा संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड यांच्या अध्यक्षते खाली शनिवार दिनांक १३ रोजी ऋतुरंग हाॅल बी.एस.एन.एल आँफिसच्या बाजुला विश्राम बाग सांगली येथे संप्पन्न झाल्याची माहिती सांगली विभागीय अध्यक्ष महादेव कुलकर्णी यांनी दिली.
राज्याचे सरचिटणीस सदानंद विचारे,कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड,खजिनदार गणेश वायफळकर,सहसचिव पांडुरंग जाधव,संघटक सचिव प्रभाकर आंबेकर,राज्य प्रसिद्धी सचिव रत्नपाल जाधव,केद्रिय उपाध्यक्ष हरिश्चंद्र जयपुरकर,बलभीम कुबडे,शिवाजी शिंदे,जनार्दन पाटील रमेश यादव,हेमंत कुलकर्णी बाबासाहेब कोकणे,राजेंद्र घरत,अनिल वाळवी,रमेश महामुनी,मारुती साबळे,सुभाष जाधव,साहेबराव पाटील,विजयराव शिंदे,सय्यद हमीद,रामदास म्हसकर,अभिमन्यु शिरसाट,सी.डी.ठाकरे, एस.टी.पाटील,गजानन पाटील,आर.के.टावरे,सत्यनारायण चंबुल,गंगाधर कोतकर,रमाकांत पाटील,रुस्तम खोमणे,जनार्दन सावंत गोदोबा शिंदे,के.जी.माळी,विलास कदम,गोरखनाथ बेळगे,दिपक वैष्णव,गजानन पाटील,चांगरे,पुंडलिक दुरुगकर,अशोक थत्ते,आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व प्रथम दिपप्रज्वलन व श्री गणेशाला वंदन झाले.साथी बाबा आढाव,साथी पन्नालाल सुराणा,काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकुरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.व सभेची सुरुवात झाली.सांगली विभागातर्फे आलेल्या सर्व राज्य कार्यकारीणीच्या पदाधिकारी यांचे पुष्प गुच्छ देउन स्वागत करण्यात आले.सहसचिव पांडुरंग जाधव यांनी मागील सभेचे ईतिवृत्ताचे वाचन केले.राज्यभरातील संघटनेच्या सभासद संख्येचा एकंदर आढावा कोषाध्यक्ष गणेश वायफळकर यांनी घेतला.










