आपला जिल्हा

आमदार सुरेश धस यांचे जाहिर आवाहन-आष्टी/पाटोदा/शिरूर कासार तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण तात्काळ NSC ट्रांसफार्मर साठी तात्काळ अर्ज करावे.

बीड जिल्हा(प्रतिनिधी–गोरख मोरे)

शेतीपंपाच्या ट्रान्सफॉर्मर वरील घरगुती वीज वापराचा भार कमी करण्यासाठी NSC योजने अंतर्गत तातडीने महावितरणा कडे अर्ज करा.न्यू सर्व्हिस कनेक्शन (NSC)ही नवीन योजना आता लागू झाली असून त्या अंतर्गत जर १० घरगुती वीज वापरणारे ग्राहक जर एकत्र आले तर त्यांना २५ KVA चा ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद आहे.जर २० ग्राहक एकत्र आले तर ६३ KVA आणि ४५ ग्राहकांच्या समूहाला देखील १०० KVA ट्रान्सफॉर्मर या योजनेतून मिळणार आहे.

आणि विशेष म्हणजे ही योजना घरगुती ग्राहकांना प्रत्येकी २५०० रुपयांत मिळणार आहे.या प्रकारे घरगुती वापरासाठी जर नागरिकांनी या योजनेत अर्ज केले तर शेती पंपाच्या साठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मर वर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल आणि घरगुती आणि शेती या दोन्ही ठिकाणी विजेचा सुरळीत पुरवठा शक्य होईल.तेव्हा माझी आष्टी/पाटोदा/आणि शिरूर कासार तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण तात्काळ या NSC योजनेअंतर्गत अर्ज करावेत.लवकरात लवकर आपल्यासाठीचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून बसवण्यात येईल.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!