आपला जिल्हा

बीडमध्ये २४१ कोटीचा भूसंपादन घोटाळा,७३ कोटी रुपयांचा अपहर; दहा जणावरोधात गुहा दाखल.

राष्ट्रीय महामार्गाच्या १५४ प्रकरणातील लवाद प्रकरणात जुन्या तारखा व तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश तयार करून २४१.६२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला.

(बीड) दिं.२०प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

बीडच्या राष्ट्रीय महामार्गाच्या १५४ प्रकरणातील लवाद प्रकरणात जुन्या तारखा व तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश तयार करुन २४१.६२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला.त्यातील ७३ कोटी रुपयांचे कोटी रुपयांचे वाटप झाल्याने तो अपहार झाल्याची तक्रार भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आहेत.बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अप्पर जिल्हाधिकारी,तहसलीदार महसूल आणि भूसंपादन कार्यालय बीड कार्यालयास भेटी दिल्या.तसेच जायकवाडी प्रकल्प भूसंपादन आणि उपविभागीय अधिकारी बीड ही कार्यालये तपासली.भेटी दरम्यान काही संचिका तपासल्या.भूसंपादन लवाद प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव व पदनाम लिहून वाढीव भूसंपादनाचे आदेश मंजूर केले.त्यावरच्या तारखाही जुन्या होत्या.भ्रमणध्वनीवरील संभाषणातून ही बाब उघडकीस आली.

जुन्या तारखेचे ४० प्रकरणे आणखी केले जातील असे उल्लेख असणाऱ्या ध्वनीफिती जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आल्या.१ मार्च ते १७ एप्रिल २०५ दरम्याच्या १५४ बनावट आदेश आदेशाव्दारे २४१.६२ कोटी रुपयांची वाढीव रक्कम मंजूर असल्याचे कागदपत्र तयार करण्यात आले.या कागदपत्राच्या आधारे छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून ७३ कोटी रुपयांचा निधी मिळवून त्याचे वितरण करण्यात आले.१७ एप्रिल रोजी असे ५० बनावट आदेश मंजूर करण्यात आले.त्यादिवशी कोणताही पक्षकार हजर नव्हता. त्यामुळे हा प्रकार संशास्पद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

भूसंपादनातील अधिकारी,कर्मचारी,वकील यांनी संगनमताने हा कोट्यावधीचा घोटाळा केल्याचे दिसून आल्यानंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.या घोटाळ्याची व्याप्ती पाहता बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

अशी आहेत घोटाळ्यातील आरोपीची नावे

या गैरप्रकारात परळी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे,अविनाश चव्हाण(कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर,भूसंपादन समन्वय कार्यालय),शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी ऑपरेटर भूसंपादन जायकवाडी प्रकल्प कार्यालय)व त्रिबंक पिंगळे (सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड)पांडुरंग पाटील (सहायक महसूल अधिकारी,भूसंपादन समन्वय कार्यालय)राऊत(राष्ट्रीय महामार्ग कार्यालय),ॲड.एस.एम.नन्नवरे, ॲड.नरवडकर,ॲड.पिसूरे,ॲड.प्रवीण राख यांची नावे आहेत.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!