(बीड)दिं.२३प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केली.यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच दोघांचं लग्न झालं होतं.या लग्नाला पंकजा मुंडे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत उपस्थित होत्या. पंकजा मुंडे अनंत गर्जेला मुलासारखे मानतात.पंकजा मुंडेंसोबत मागील काही वर्षांपासून पीए म्हणून अनंत गर्जे काम करत.अत्यंत थाटामाटात गौरी आणि अनंत यांचा विवाहसोहळा पार पडला.अनंत गर्जे यांच्या पत्नी मुंबईतील केईएम रूग्णालयात कार्यरत होत्या.त्यांनी गळफास लावून घेत आयुष्य संपवलं आहे.

नेमकी काय घटना घडली?
मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी २२ नोव्हेंबरच्या रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काही महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं.या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे.मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे.पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल,असे सांगितले जात आहे.दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे.या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले.या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
गौरीच्या मामांनी काय आरोप केला आहे ?
गौरीचे मामा श्रीनिवास म्हणाले गौरीने आत्महत्या केलेली नाही.अनंत गर्जेने तिच्या वडिलांना फोन केला आणि कट केला.त्यानंतर त्याने गौरीच्या आईला फोन केला आणि सांगितलं की गौरीने फाशी घेतली आहे.गौरीने फाशी घेतली तर अनंतने तिला रुग्णालयात न्यायला हवं होतं.आम्ही पोलिसांकडे गेलो तर आमच्या बरोबर यायला हवं होतं.पण तो कुठेही आला नाही.अनंत गौरीला टॉर्चर करत होता.तिचा छळ करत होता.कारण गौरीला अनंतबाबत काही गोष्टी समजल्या होत्या.अनंतचं अफेअर चाललं होतं आणि ते गौरीला कळलं होतं.गौरीच्या लग्नात तिच्या वडिलांनी ६० लाख रुपये खर्च केला होता.लग्नानंतर दोन महिने बरे गेले.त्यानंतर तिला अनंतने छळायला सुरुवात केली होती असा गंभीर आरोप गौरीचे मामा शिवदास यांनी केला आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!