(मुंबई)दिं.१७ प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

एस.टी महामंडळातील मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात लढण्याकरीता ४५ वर्षांपूर्वी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली होती आणिबाणीच्या काळात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती त्यावेळी ह्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कास्ट्राईब कल्याण महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते मात्र एस टी कामगारांच्या प्रश्नावर लढण्यासाठी नोंदणीकृत कामगार संघटनेची आवश्यकता असल्याचे एस टी प्रशासनाने सांगितले त्यामुळे कामगार संघटना म्हणून कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना स्थापन करून त्याची नोंदणी करण्यात आली तेव्हा पासून कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटना सातत्याने मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात संघर्ष करत आली आहे मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने मागणी आणि त्याचा पाठपुरावा केला आहे कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नांमुळे अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे त्यामुळे हजारो उमेदवारांना नोकरी मिळाली आहे सन २०१० मध्ये आरक्षण धोरणाच्या विरोधात परिपत्रक काढण्यात आले होते कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेने त्याविरोधात आवाज उठवला अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य वरळी मुंबई यांचेकडे तक्रार दाखल केली आंदोलन केले त्याचा परिणाम म्हणून सदर आरक्षण विरोधी परिपत्रक रद्द करण्यात आले त्यामुळे जवळपास दोन हजारांहून अधिक मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळाली अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी कित्येक कामगारांच्या वारसांना मदत केली कारण सर्व सामान्य माणसाला नोकरी मिळाली पाहिजे त्याच्या घरी चुल पेटली पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता नोंदणीकृत कामगार संघटना म्हणून एस टी कामगारांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने आंदोलन केले प्रसंगी कृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र करून त्यामाध्यमातून पगारवाढीसाठी आंदोलन केलेत कामगारांचे प्रलंबित आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने आंदोलन, संघर्ष,पाठपुरावा केला त्यामुळे कामगारांच्या पगारवाढीच्या प्रश्नावर काही प्रमाणात यश मिळाले मात्र आजही शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे एस टी कामगारांना पगार मिळत नाही त्यामुळे भविष्यात शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे पगारवाढ मिळाली पाहिजे तसेच प्रलंबित आर्थिक थकबाकी देण्यासाठी आंदोलन करण्याची कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेची तयारी आहे ह्या करीता पुन्हा एकदा सर्व संघटना एकत्र करून कृती समिती करण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र जर कोणी तयार नसतील तर राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे व त्यानंतर एक मोठे निर्णायक आंदोलन करण्यात येणार आहे याची सुरुवात येत्या गुरुवारी दि २० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन,दादर, मुंबई येथे आयोजित ४५ व्या वर्धापनदिन सोहळ्यापासून करण्यात येणार आहे

कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा धर्मपाल ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ह्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष मा भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे ह्या वर्धापनदिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार मा आनंदराव अडसूळ अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई,मा उत्तमराव खोब्रागडे माजी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, माजी न्यायमूर्ती मा सी एल थुल माजी अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग,मा डॉ माधव कुसेकर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे उपस्थित राहणार आहेत यावेळी संघटनेचे सरचिटणीस तथा आयबीसेफ चे अध्यक्ष सुनिल निरभवणे, आयबीसेफ चे सरचिटणीस एड एस के भंडारे, आयबीसेफ चे उपाध्यक्ष तथा औल इंडिया बैकींग मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे नेते मा शरद कांबळे, कास्ट्राईबचे कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, कार्याध्यक्ष विजय नंदागवळी, वरिष्ठ उपाध्यक्ष वाल्मिक येलेकर, एड उदय मालाधारी,कुवरलाल तिलगामे, राजेंद्र माहूरे, जीवन जाधव,औल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे संस्थापक सदस्य देवा पवार, शशिकांत ढेपले, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, सी डी आढाव,एम जी कांबळे, गौतम कांबळे, जनार्दन लोंढे,के एस भोले, देविदास दामोदरे,बी एस खंडारे, नंदरत्न खंडारे, गणेश कांबळे, रविंद्र मांडवे, संजय पोवार यांच्यासह राज्यातील विविध विभागातून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एस टी कामगार उपस्थित राहणार आहेत ह्या वर्धापनदिन सोहळ्यात संघटनेचे माजी अध्यक्ष मा पी टी खंडारे, माजी सरचिटणीस धम्मप्रिय हातेकर, विश्वनाथ खांडेकर,आर एस फुलकर, अभिमन्यू लोखंडे, रामचंद्र हिरे भाऊ यांचा त्यांनी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात दिलेल्या संस्मरणीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे प्रसिद्धी सचिव विश्वनाथ जाधव यांनी दिली आहे
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!