आपला जिल्हा

आष्टी तालुक्यातील मौजे सुलेमान देवळा ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून शासकीय कागदपत्राची जाळपोळ-अंभोरा पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल.

बीड जिल्हा (प्रतिनिधी–गोरख मोरे)

आष्टी तालुक्यातील मौजे सुलेमान देवळा येथिल ग्रामपंचायत मध्ये,दिनांक १४/११/२०२५ रोजी रात्री आठ साडेआठ च्या दरम्यान गावातील व्यक्तीने कुऱ्हाडीच्या साह्याने ग्रामपंचायत कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून, आतील शासकीय कामकाजाचे दप्तर जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले असून आज उशिरा दुपारी अंभोरा पोलीस स्टेशन येथे भा.द.वी.324,(3)329(4)443 नुसार पोपट मलुदेव गायकवाड या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला.

काल रात्री आठ साडेआठ च्या दरम्यान ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून शासकीय कागदपत्र जाळले अशी फिर्याद गावचे सरपंच दादासाहेब यादव घोडके यांनी अंभोरा पोलीस स्टेशन येथे दाखल केली. भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारी सदर घटना असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

दुसरी बाजु तपासली असता गेल्या तीन वर्षापासून सुलेमान देवळा ग्रामपंचायत मध्ये एकही ग्रामसभा झाली नसून, वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी,घरकुल,संडास,फळबाग,गाय गोठा,शेततळे,अन्य शासकीय योजनेसाठी संबंधित सत्ताधारी सरपंचाकडुन लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला असून नाकारता येत नाही.
निवडणुकीत आश्वासन देऊन सत्तेत आल्यानंतर,संबंधित व्यक्तींना घरकुल न भेटण्याचा रोश,त्याबाबत आर्थिक देवाण-घेवाणी मुळे तर हि घटना घडली नाही ना?

असा संशय व्यक्त होत असून संबंधित कागदपत्रात नेमके काही आर्थिक भ्रष्टाचाराचे पुरावे तर नष्ट केले नाहीत ना? याची सुद्धा चौकशी व्हावी व संबंधित दोशीवर कोठोरात कठोर शासन व्हावे असे मोजे सुलेमान देवळा येथिल सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!