बीड जिल्हा (प्रतिनिधी-गोरख मोरे)
स्थानिक स्वराज्य संस्था-जिल्हा परिषद/पंचायत समितीचे पडघम वाजले असल्याने धानोरा गटातून जिल्हा परिषद/पंचायत समिती साठी अनेक इच्छुक उमेदवारांची नाराजी झाली तर,काही उमेदवार कामाला लागले असून धानोरा जिल्हा परिषद गट सर्व साधारण महिला ओपन साठी सुटला असल्याने आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांच्या सुविद्या पत्नी सौ.मनीषा अंकुशराव चव्हाण यांनाच धानोरा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी धानोरा येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष विठ्ठल शेळके यांच्यासह धानोरा गटातील नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

पुढे सांगितले की,धानोरा गटामध्ये जवळपास२०/२५ गावांचा संपर्क असून या भागात धानोरा येथील परिस्थिती वरतीच बरसा भाग अवलंबून आहे.
माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात आष्टी तालुक्यात भेदभाव न करता ज्या ठिकाणी रस्ता नाही तिथे रस्ता,ज्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी लाईटची सोय,वाडी-वस्ती ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाण्याची सोय आदी विकास कामे सर्वसामान्य जनतेसाठी केली.सर्वसामान्य जनतेच्या विकास कामात त्यांनी राजकारण कधीच आणले नाही, विकास कामात भेदभाव केला नाही,त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व जनतेची सेवा एक शेवक म्हणुन चांगल्या प्रकारे केली.आणि आज पदावरती नसतानाही धानोरा जिल्हा परिषद गटात सर्वसामान्य जनतेच्या कायम सदैव सुखदुःखात आहेत.गोरगरीब जनतेच्या कामासाठी रात्रंदिवस ते धावपळ करतात,कामाच्या बाबतीत ते कधीच भेदभाव न करता आपुलकीने कामे करतात.

माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांना तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामाचा चांगला अनुभव असून धानोरा गटात सर्वसामान्य जनतेसाठी नक्कीच विकास कामे चांगल्या प्रकारे करतील या करिता आष्टी/पाटोदा/शिरूर कासार मतदार संघाचे विद्यमान आमदार सुरेश(आण्णा) धस यांनी माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांच्या सुविद्या पत्नी मनीषा अंकुशराव चव्हाण यांना उमेदवारी द्यावी.
त्यांच्या पत्नी उच्चशिक्षित आहेत.त्यांचा धानोरा गटात जनसंपर्क चांगला आहे ते कायम सर्वांच्या सुखदुःखात धावून जानार व्यक्तिमत्व असुन जातात.धानोरा गटातील सर्वसामान्य जनतेची सुद्धा माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांच्या सुविद्या पत्नी मनीषा अंकुशराव चव्हाण यांनाच धानोरा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याची आग्रही मागणी असून अंकुशराव चव्हाण यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी असल्याचे स्पष्ट बोलून दाखवतात.

माजी सभापती अंकुशराव चव्हाण स्वच्छ- निष्कलंक चेहरा आहे.कामाच्या बाबतीत त्यांचा नेहमी हातखडा आहे.कामाच्या बाबतीत कधीच भेदभाव करणारा नसून सर्व जाती-धर्माच्या समाजाला धरुन समाजात जाऊन समस्या सोडवतात .एवढेच नाही तर कोणत्याही समाजातील अडले-नडले आजारी व्यक्ती असो त्यांच्या दवाखान्यापर्यंत जाऊन त्यांना जे दवाखान्यात सहकार्य पाहिजे ते सहकार्य करुन सदर व्यक्तीला घरी आणून सोडण्यापर्यंत प्रामाणिकपणे ते आजही काम करतात.एवढेच नव्हे तर मग ते काम कोणत्याही क्षेत्रातील काम असो आणि याच कामाच्या अनुषंगाने माझ्यासह धानोरा गटातील सर्वसामान्य जनतेची आग्रही मागणी असून विद्यमान आमदार सुरेश(आण्णा)धस यांनी धानोरा जिल्हा परिषद गटातून माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांच्या सुविद्या पत्नी मनीषा अंकुशराव चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी,अशी आग्रही मागणी धानोरा येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष विठ्ठल शेळके यांच्यासह धानोरा गटातील नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!