बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता महाविद्यालयातील तीन कुस्तीपटू विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेमध्ये दोन मुलींनी कुस्ती चिटपट करत आपापल्या वजनी गटात यश प्राप्त केले असून यामध्ये सावरी सातकर आणि तुलसी पाथरे या कुस्ती खेळाडू मुलींनी सुवर्णपदक प्राप्त केले.या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच पैलवान श्री.किरण मोरे सर उपस्थित होते.

या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणासाठी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,आमदार सतीश चव्हाण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.देशमुख सर,नळदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राठोड सर,व बालघाट शिक्षण संस्था नळदुर्ग चे सर्व संचालक या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित होते.

या स्पर्धे प्रसंगी धानोरा येथील जनता महाविद्यालयाचे प्राध्यापक गलांडे सर, प्राध्यापक गाडे सर खेळाडू समवेत होते. धानोरा महाविद्यालयातील कुस्ती खेळाडू मुलींनी जनता महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खैल्याने जनता महाविद्यालयाची मान उंचावली असून

यशस्वी कुस्ती खेळाडू मुलींचे संस्थेचे अध्यक्ष अब्दुल भाई सय्यद,संस्थेचे सचिव तथा माजी सभापती विजयकुमार बांदल (अण्णा)महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुपेकर सर,मार्गदर्शक विशाल बांदल (भैय्या)मुख्याध्यापक-प्राचार्य ढोबळे सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य तिपोळे सर, प्रा.विक्रमजी बांदल सर,प्रा.गाडे सर,प्रा.गिरी सर,प्रा.चंदनशिव सर,व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचे कौतुक करत अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!