Maharashtra
Trending

पाटोदा ते शंभरचिरा करंजवन फाटा रोड ६.६१कोटींचे बोगस काम-ॲड.एन.एल.जाधव यांच्या तक्रारीनंतर पुन्हा नव्याने दर्जेदार-मानकाप्रमाणे काम गुत्तेदाराकडून करून घेण्याचे कार्यकारी अभियंता (PMGSY)यांचे आश्वासन.

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY)अंतर्गत MRL०१ राष्ट्रीय महामार्ग ५६१जवळाला-करंजवन फाटा ते पाटोदा या ५.३किलोमीटर रस्त्याचे (एकूण खर्च ६६१.११ लक्ष रुपये)काम दर्जाहीन व अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याची गंभीर तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांनी केंद्र व राज्य सरकारकडे ३ सप्टेंबर २०२५ रोजी केली होती.

तक्रार काय होती ?

रस्ता काम इस्टिमेट व इंडेक्स प्रमाणे झालेले नाही.⁠काम सुरु असतानाच अनेकवेळा नागरिक व माध्यमांनी निष्कृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या.त्यासंदर्भात Google GPS फोटो/वृत्तपत्रातील बातम्या/ग्रामस्थांची निवेदने व खासदारांची तक्रार हे पुरावे सरकारकडे सादर करण्यात आले असताना देखील काहीच कारवाई झाली नाही.

*सदरील काम हे राजकीय पाठिंबा असणाऱ्या ठेकेदाराला करण्यासाठी दिल्यामुळे संबंधित ठेकेदार यांनी अंदाजपत्रिका प्रमाणे काम न करता रस्ता न खोदता खालच्या खडीवर मुरूम टाकून कसलाही भर न टाकता काम सुरू केले व जुना रस्ता न खोदता आजूबाजूची खडी ओढून निष्कृष्ट दर्जाचे काम केले आहे.
*सदरील संपूर्ण कामाची त्रयस्थ वरीष्ठ विभागीय गुण नियंत्रकांकडून नागरीका समक्ष गुण पडताळणी करावी व दर्जाहीन काम करणारा ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्याकडून झालेली नुकसान भरपाई घ्यावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे.रस्त्याचे काम अंदाजपत्राकाप्रमाणे करून जनतेला दर्जेदार रोड करून द्यावा.*शेजारचाच बीड-आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग (NH-५६१)पाच वर्षांपूर्वी डांबरीकरण झाला असून,त्यालाही तेव्हढ्याच अतिवृष्टीचा सामना करावा लागला तरी तो अबाधित आहे.मग PMGSYअंतर्गत झालेला रस्ता एवढ्या लवकर खराब का झाला?
*कामात गंभीर गैरव्यवहार झाला असून,६ कोटी रुपयांचा जनतेचा निधी वाया गेला आहे .

संबधित अधिकाऱ्याने त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर केला असल्याचे उघड.
*राज्य गुणवत्ता निरीक्षक यांचेकडून गुणवत्ता व परिणामाची ४ वेळा तपासणी झाल्याचे सांगितले आहे त्यानंतर अवघ्या एका महिन्यातच सर्व रस्ता उखडला याचा अर्थ गुणवत्ता तपासणी अहवाल खोटे दिले.संबंधित अधिकाऱ्यांनी ⁠दि.०९.०७.२०२५ रोजी च्या सविस्तर व पुराव्यासह दिलेल्या तक्रारिची दखल घेतली नाही.सदरील काम अतिशय निष्कृष्ठ असताना देखील झालेल्या कामाबाबत समाधानकारक शरे प्राप्त आहेत असे सांगून अधिकाऱ्याकडून ठेकेदाराची पाठराखण करण्यात आली होती.ग्रामविकास मंत्रालय यांचे निर्देशाने कार्यकारी अभियंता बीड यांचे आश्वासन.
ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे ॲड.नरसिंह जाधव यांना पत्राद्वारे कळविले होते.

त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता बीड यांनी सध्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे काम करणे शक्य नाही, पाऊस थांबल्यानंतर काम करण्याची परिस्थिती निर्माण झाल्या नंतर सदर रस्त्याचे मानकाप्रमाणे दर्जेदार काम करून देण्यात येईल,तदनंतर त्रयस्थ यंत्रणेद्वारे राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याकडून तपासणीनंतर देयक अदा करण्यात येईल असे कळविले आहे.वरील आश्वासनानंतर प्रत्यक्ष इस्टीमेट प्रमाणे दर्जेदार काम न केल्यास लोकशाही मार्गाने व कायदेशीर मार्गाने पाटोद्यातील जनतेच्या वतीने लढा चालू ठेवणार असे ॲड.नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!