NAGPUR-प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
नागपूर: दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवार क्रांतीभूमी, दिक्षाभूमीनगरी नागपूर येथील गुरुनानक भवन, राममनोहर लोहिया वाचनालय जवळ अशोक नगर, इंदोरा,उत्तर नागपूर येथे रिपब्लिकन पक्ष खोरीपा चे राष्ट्रीय अधिवेशन वैचारिक क्रांतीने दुमदुमले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र,राज्यसभेचे माजी उपसभापती तथा रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस दिवंगत नेते बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ९-३०.वा.राष्ट्रिय अध्यक्ष देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या हस्ते संविधान चौकात प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर इंदोरा चौकात बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला कमाल टौकीज चौकात हरिदास बाबू आवळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर अधिवेशनाच्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष( खोरीपा)चे राष्ट्रीय अध्यक्ष मा देशकजी खोब्रागडे यांचे हस्ते झेंडावंदन करून तसेच प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर, बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, तसेच माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.अधिवेशनाच्या सुरुवातीला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात व सहवासात काम केलेले रिपब्लिकन नेते दिवंगत मारोतराव कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके यांनी स्वागताध्यक्ष म्हणून सर्व मान्यवरांचे स्वागत केले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा डॉ एन व्ही ढोके यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रात देशातील वर्तमान राजकीय परिस्थिती आव्हाने व उपाययोजना या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.प्रमुख वक्ते म्हणून पक्षाचे प्रवक्ते प्रशिक आनंद , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे,प्रा मुकुंद मेश्राम,डॉ विनायक गणवीर अध्यक्ष, नागपूर प्रदेश यांनी देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर परखड विचार मांडले आणि ह्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची आवश्यकता आहे हे ठासून सांगितले त्यानंतर दुसऱ्या सत्रात रिपब्लिकन चळवळीत महिला,युवक, विद्यार्थी यांचा सहभाग काळाची गरज या विषयावरील परिसंवादात वक्ते म्हणून प्रकाश तारु अध्यक्ष रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन, महाराष्ट्र प्रदेश,आयु गच्चे अध्यक्ष, मराठवाडा प्रदेश,संघमित्रा खोब्रागडे, चंद्रपूर यांनी आपले विचार मांडले.दोनही सत्राचे नंतर अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय प्रवक्ते डॉ एन व्ही ढोके यांनी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला संसदेतील त्यांनी मांडलेल्या विषयाची माहिती सविस्तर सांगितली

सायंकाळी चार वाजता राष्ट्रीय अध्यक्ष देशक गिरीश खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखालील खुल्या अधिवेशनात उत्तमराव गवई राष्ट्रीय सरचिटणीस, उपाध्यक्ष डॉ शिवशंकर बनकर, विदर्भवादी नेते अरुण केदार,सुनिल चोखारे,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ देवेश मारोतराव कांबळे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे,उपाध्यक्ष सी एम रामटेके,विनोद साळवी,अतिरिक्त सरचिटणीस प्रा अशोक ढोले,चंद्रकांत वाघमारे,मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मनोहर भिडे आदींनी आपले विचार मांडले प्रशिक आनंद प्रवक्ते यांनी ठराव वाचन केले ठरावाला

उपस्थितांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांनी उपस्थितांना आश्र्वासित केले की, रिपब्लिकन पक्ष पुन्हा नव्या जोमाने उभा करु त्याकरीता संपूर्ण राज्यात आणि देशात ठिकठिकाणी फिरुन आंबेडकरी जनतेला विश्वासात घेऊन प्रबळ विरोधी पक्ष उभा करून दाखवू. प्रामाणिक, निष्ठावंत,त्यागी कार्यकर्ते आजही मोठ्या संख्येने पक्षात आहेत त्यांच्या जोरावर हे शक्य आहे असे त्यांनी सांगितले त्याकरीता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटातील नेत्यांना एकत्र करून निवडणुका लढवणार आहोत जर इतर गटाच्या नेत्यांनी सोबत यायला नकार दिला तर मात्र स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असेही मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांनी सांगितले
ठराव खालील प्रमाणे आहेत
१) राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या निवडीला मंजुरी देण्यात येत आहे.
२) केंद्रीय कार्यकारिणीत पक्ष वाढीसाठी योग्य व सक्षम पदाधिकाऱ्यांची निवड करून पक्षास गतिमान करणे.
३) भारतीय संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करणे
४) राज्यातील विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे याकरिता संघर्ष करणे
५) मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे
६) अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना कायम राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे
६) संशोधक विद्यार्थी यांना फेलोशिफ वेळेवर मिळावी यासाठी प्रयत्न करणे
७) परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्यात यावी
८) प्रबुद्ध शिष्यवृत्ती योजना राज्यात सुरु करावी
९) २१ जून १९७९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्थसंकल्पातील १५ टक्के रक्कम अनुसूचित जाती करीता राखीव ठेवण्यात यावा यासाठी संघर्ष करणे
१०) अनुसूचित जाती जमातीचा अर्थसंकल्पातील निधी इतरत्र वळविण्यात येऊ नये याकरिता कायदा करण्यात यावा यासाठी संघर्ष करणे
११)खाजगीकरण कंत्राटीकरण थांबविण्यात यावे,मात्र काही ठिकाणी अपरिहार्य असल्यास त्यात आरक्षण धोरण लागू करण्यात यावे याकरिता संघर्ष करणे
१२) सरकारी नोकरीतील आणि बढतीतील राखीव जागांचा अनुशेष भरण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्यात यावा
१३) अनुसूचित जाती जमातीच्या ग्रामीण भागातील लोकांना कायम स्वरुपी सुरक्षा देण्यात यावी असा राज्य सरकारने निर्णय घ्यावा
१४) वोटचोरीच्या मुद्द्यांना लक्षात घेऊन,लोकशाहीवरील जनतेची विश्वासार्हता ढासळू नये म्हणून निवडणूक आयोगास निःपक्षपातीपणाने कार्य करण्यासाठी पक्ष संघर्षरत राहून भाग पाडेल.
१५) मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलेल्या कर्जाला माफी मिळावी तसेच नवीन कर्जाची रक्कम वाढविण्यात यावी
१६) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी
१७) शेतकरी,शेतमजूरांना सुद्धा अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळावी
१८) घरकुल योजनेतील अनुदानात वाढ करावी
सर्व ठरावाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सुदर्शन मुन प्रा.किशोर शेंडे,सुदेश शेंडे,कमलेश मेश्राम,आनंद वानखेडे,चंद्रमणी गजभिये,रवि पाटील,किशोर सोमकुवर यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन राजू भाऊ गजभिये,अजयकुमार बोरकर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रशांत डांगे यांनी व्यक्त केले.अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यांनी दिली आहे
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!