बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)
येडशी (तालुका- जिल्हा उस्मानाबाद) येथील रहिवासी संतोष बाळासाहेब कांबळे यांनी त्यांच्या कामाबरोबरच सामाजिक क्षेत्रात तसेच पीडित महिला, बालरोजगार,भ्रष्टाचार आदी क्षेत्रात चांगले निर्भीड,निपक्ष,उत्कृष्टपणे काम केल्याने त्यांच्या कार्याची दखल भारत सरकार नीती आयोग द्वारा पंजीकृत केंद्रीय संघटन मानव अधिकार दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आली असून संतोष कांबळे यांना २०२५ चा मानव रक्षा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार१०ऑक्टोबर२०२५रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमात सन्मानित केला जाणार आहे.
संतोष कांबळे यांना मानव रक्षा पुरस्कार जाहीर झाल्याने येडशी गावची मान आणि शान वाढली असून संतोष कांबळे पत्रकारिते बरोबरच केंद्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा सेक्रेटरी आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून सध्या काम करत आहे.

संतोष कांबळे हे आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालयातील माजी विद्यार्थी आहे.येथील शाळेत यांचे शिक्षण झाले असून संतोष कांबळे यांना २०२५ चा मानव रक्षा पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेचे अध्यक्ष अब्दुलभाई सय्यद,सचिव विजयकुमार(आण्णा) बांदल,विठ्ठल बांदल सर,मुख्याध्यापक/प्राचार्य,सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, बीड जिल्हा प्रतिनिधी गोरख मोरे,येडशी (तालुका-जिल्हा उस्मानाबाद)येथील नागरिक,मित्र परिवारांनी पुरस्काराची निवड झाल्याने अभिनंदन करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या .
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!