(मुंबई)दि.२५प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तपत्र.
बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे आंबेडकरी चळवळीतील प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरचे एक मोठे नेते होते संसदीय राजकारणात त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे परदेशी गेलेल्या कित्येक संसदीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता काही शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले १९६९-१९७२ या कालावधीत ते राज्यसभेचे उपसभापती होते असे आंबेडकरी साहित्याचे संशोधक मा विजय सुरवाडे यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तथा राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी सोहळा गुरुवार दि २५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७-०० वा प्रेस क्लब,मुंबई मराठी पत्रकार भवनाच्या शेजारी,मुंबई येथे संपन्न झाला त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ह्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रिपब्लिकन नेते मा. अर्जुन डांगळे यांनी सुद्धा बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला यावेळी माजी न्यायमूर्ती डी.के सोनवणे,आशाताई लांडगे,शशिकांत भालेराव यांनी आपले विचार मांडले

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र झेंडे यांचा रिपब्लिकन नेते मा. अर्जुन डांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हेमंत मोकळ यांनी सुत्रसंचलन केले मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने मान्यवरांचे स्वागत केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद साळवी,मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,कौम्रेड अशोक पवार,सलीम सय्यद,ठाणे शहर अध्यक्ष गौतम कांबळे यांच्यासह मुंबई प्रदेशातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिली आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!