बीड जिल्हा (प्रतिनिधी–गोरख मोरे) “प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा अहिल्यानगर ते बीड रेल्वे ड्रीम प्रोजेक्ट ना. पंकजाताई मुंडे व माजी खा.प्रितमताई मुंडे यांच्या अथक प्रयत्नाने पूर्ण होत असून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून अहिल्यानगर ते बीड रेल्वे १७ सप्टेंबरला प्रत्यक्षात धावणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. १७ रोजी हिरवा झेंडा दाखवुन शुभारंभ करणार असून परळी पर्यंतचा ड्रीम प्रोजेक्ट ना.लवकरच पुर्ण होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगीतले.याबाबत अधिक माहिती देताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले की, आष्टी/पाटोदा /शिरूर/बीड या भागातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न १७ सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात साकार होणार असून गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक अहिल्या नगर –बीड — परळी हा रेल्वेमार्ग कधी पूर्ण होतो याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते . अखेर तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे. सुरुवातीला अहिल्या नगर ते आष्टी हा पहिला टप्पा पुर्ण करुन आष्टी पर्यंत रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. आता पुढील काम पुर्ण झाल्याने बीड पर्यंत रेल्वे धावणार असुन परळी पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी अहिल्यानगर –बीड परळी रेल्वेचे स्वप्न पाहिले होते व ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना काळाने त्यांचा घात केला . पण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा त्यांच्या कन्या ना. पंकजाताई मुंडे व तत्कालीन खा. डॉ. प्रितम ताई मुंडे यांनी उचलून राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आता प्रत्यक्षात रेल्वे धावण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळी येथील सभेत रेल्वेसाठी केंद्र सरकार संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी वेळच्या वेळी निधी उपलब्ध करून दिला. लोकसभा सदस्य असताना डॉ. प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी लोकसभेत या विषयावर पाठपुरावा केला.लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे यांनी राज्यात ग्रामविकास मंत्री असताना राज्य सरकारला या रेल्वेसाठी अर्धा वाटा देण्यास भाग पाडले. दोन्ही मुंडे भगिनींनी या रेल्वेसाठी अथक परिश्रम करुन बीडकरांचे व मुंडे साहेबांचे स्वप्न साकार केले आहे. यांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे.नगर बीड रेल्वेमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चित चालना मिळणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे त्यादृष्टीने रेल्वे प्रशासन आणि गतीने कामाला लागले असून बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील भूसंपादनाच्या कामालाही प्रशासकीय गती दिली आहे. आष्टी/ पाटोदा/ शिरूर /बीड लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे शंकर देशमुख यांनी सांगितले आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!