आष्टी/बीड दिं.५(प्रतिनिधी-गोरख मोरे)“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता विद्यालयातील चित्रकलेच्या माजी सहशिक्षिका आदरणीय कै.स्नेहलता बाळासाहेब कांबळे मॅडम (वय ७५)वर्ष यांचे पाच सप्टेंबर २०२५ शिक्षक दिनी सकाळी११च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.यांच्या पाश्चात पती,दोन मुलं,एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार असून,त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी येडशी(जिल्हा उस्मानाबाद)या ठिकाणी सायंकाळी आठ वाजता करण्यात आला.
या अंत्यविधी प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक,राजकीय सर्व स्तरातील नागरिक,आप्तेष्ट,मित्रपरिवार सहभागी झाले होते.

आणि कलेचा दिवा विझला……!!
कै.कांबळे मॅडम यांनी आपली पूर्ण सेवा जनता विद्यालय धानोरा या ठिकाणी चित्रकला शिक्षिका म्हणून केली,सेवा करत असताना त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले असून विद्यार्थ्यांना त्या आईच्या मायेने जीव लावत असत.जनता विद्यालय मध्ये त्या काळी त्या एकट्याच महिला शिक्षिका होत्या.चित्रकले मध्ये त्या अत्यंत हुशार/तज्ञ होत्या,चित्रकला हे नाव जरी घेतले तरी धानोरा परिसरात कांबळे मॅडमच होत्या,अतिशय शांत,संयमी मनमिळावू साधी राहणी आणि उच्च विचार सरणी व मितभाषी आशा स्वभावाच्या कांबळे मॅडम होत्या.त्यांच्या निधनाची बातमी आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात समजताच त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी व त्यांच्या हातून शिकून गेलेले माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना खूपच दुःख झाले.
कै,कांबळे मॅडम यांचे निधन झाल्याने कांबळे परिवारा वरती दुःखाचा डोंगर कोसळला यामध्ये संस्थेचे अध्यक्ष,सचिव, आजी-माजी शिक्षक,विद्यार्थी,बीड जिल्हा प्रतिनिधी गोरख मोरे यांच्या परिवारासह प्रवासी संचार परिवार सहभागी असुन, अशा प्रेमळ आदरणीय कै.स्नेहलता बाळासाहेब कांबळे मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!