Uncategorized

भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा ३१ ऑगस्ट भटके विमुक्त दिन आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा.

(अंबरनाथ)दिं.३१प्रतिनिधी-मनिलाल डांगे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

स्वातंत्र्यपूर्व काळात १८५७ साली ब्रिटिश राजवटी विरोधात राष्ट्रीय उठाव करण्यात आला,या उठावात ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणाऱ्या भटके विमुक्त समाजाला अमानवीय अशा गुन्हेगार जमात कायद्याने १८७१ साली तारेच्या कुंपणात बंदिस्त करून अतोनात छळ ब्रिटिश राजवटीने केला,मानवाधिकारांची पायमल्ली करत क्रुर अशी वागणूक दिली.

“सुंदरलाल डांगे”

संस्थापक अध्यक्ष -भटके विमुक्त सामाजिक संस्था (रजि) महाराष्ट्र राज्य.

स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त समाजाला न्याय मिळाला नाही,तब्बल ७ वर्षानंतर ३१ऑगस्ट१९५२ साली तारेचे कुंपण तोंडुन भटके विमुक्त समाजाला विमुक्त केले तेव्हापासून हा दिवस विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो,यावर्षी शासनस्तरावर विमुक्त दिन साजरा होत आहे,भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा स्तृत्य उपक्रम आहे त्यामुळे भटके विमुक्त समाज मोठ्या उत्साहात हा विमुक्त दिन साजरा करत आहे.

भटके विमुक्त सामाजिक संस्था समाजातील दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन सदैव आपले कार्य करत असते त्याअनुषंगाने आज निर्मलादेवी दिघे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला.आजचे विद्यार्थी हे उद्यचे भविष्य आहे त्यांना आपल्या समाजावर झालेल्या अन्यायाची जाणीव व्हावी व त्यांनी आपल्या समाजावर लागलेला कलंक पुसून मोठे सनदी अधिकारी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज येथे येऊन विमुक्त दिन साजरा करत असल्याचे याप्रसंगी बोलताना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी सांगितले.

भटके विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्याचा फायदा घेऊन आपले विद्यार्थी कसे उच्चशिक्षित होतील यावर शिक्षकांनी लक्ष द्यावे ही विनंती करत आजही समाजात विषमता पसरवून आपल्या समाजाचे नुकसान होऊ नये यासाठी आपली सर्वांची समाजाला पुढे नेण्यासाठी जबाबदारी पार पाडली जावी यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत माझा प्रयत्न असेल अशी ग्वाही देतो असे प्रतिपादन त्यांनी केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थी व शिक्षक यांचेसह वृक्षारोपण करण्यात आले,यावेळी शिक्षकांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.याप्रसंगी आश्रमशाळेतील विद्यार्थी तसेच प्रमुख पाहुणे दत्तात्रय पोवार,मुख्याध्यापिका स्वप्नाली प्रल्हाद हाके, शिक्षीका माधुरी मधुकर धांडे,शिक्षीका रंजना सावळाराम धोत्रे,अधिक्षक शिवाजी धनु चव्हाण,पदाधिकारी नवनीत बाबुराव धोत्रे व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तक्षशिला न्यूज चे संपादक हर्षद पठाडे, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती मनीलाल डांगे यांनी दिली.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!