(इस्लामपूर/सांगली)दीं.१६ प्रतिनिधी,आशा रणखांबे “प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद,भारत आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच राजारामबापू नाट्यगृह, इस्लामपूर,जिल्हा सांगली येथे माजी आमदार भगवानराव साळुंखे,महाराष्ट्र केसरी (१९७८)आप्पासाहेब कदम,ऑलम्पिकवीर बंडा पाटील रेटरेकर,पोलिस अधिकारी गणेश कोंडते या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.यावेळी मांजर्डे,गावचे सुपुत्र,थोर समाज सेवक,कुस्तीचे आधारस्तंभ डॉ.श्रीकांत सीताराम रणखांबे यांना त्यांच्या कुस्ती खेळातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांच्या हस्ते सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ देऊन गौरवण्यात आले.

क्रीडा क्षेत्राला एक नवी दिशा देणारे,राष्ट्रीय कुस्ती संघटक डॉ.श्रीकांत सीताराम रणखांबे,यांचे कुस्ती या खेळात योगदान अतुलनीय आहे.त्यांनी अनेक कुस्ती मैदानांचे सातत्याने आयोजन करून अनेक कुस्ती मैदानांना आधार देऊन सहकार्य केले आहे,त्यांचे कुस्ती खेळ वाढवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे मोलाचे महान कार्य केले आहे.क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उदात्त कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.देश भरातून नामवंत मल्लांना गावच्या कुस्ती आखाड्यात सातत्याने ते आणत आहेत.मल्लांच्या स्नेह भोजनाची सोय ते करीत आहेत.

अनेक वर्षांपासून प्रथम क्रमांकाचे ते बक्षीस लावत आहेत.अनेक मल्लांच्यावर ऑपरेशनचे मोफत उपचार करून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.शिक्षण,वैद्यकीय,सामाजिक क्रीडा आदी अनेक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांना आनंद झाला असून राणाप्रताप क्रीडा व्यायाम संस्था,दिनकरदादा युवाशक्ती,आर.आर.पाटील एज्युकेशन ट्रस्ट,राजे उमाजी नाईक मंडळ,नवतरुण बौद्ध विकास मंडळ,बौद्ध विकास मंडळ मुंबई,कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई,रमाबाई महिला मंडळ,बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य सह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे.यावेळी देशभरातून क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.अध्यक्ष विठ्ठल कालेल,सुभाष भंडारे आदीसह मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद,भारत यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!