महाराष्ट्र

अर्थसंकल्पातील अनुसूचित जातीचा वाटा,शैक्षणिक सवलती आणि पदोन्नतीतील आरक्षण ह्या मागणीसाठी १५ जुलै रोजी विधीमंडळावर आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन 

(मुंबई)दि.३प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

विधान परिषदेचे माजी सभापती वि स पागे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार २१ जून १९७९ रोजी अनुसूचित जातीच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात १५ टक्के निधी राखून ठेवण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला होता मात्र गेल्या ४५-४६ वर्षात याची अंमलबजावणी झालीच नाही उलट अनुसूचित जाती जमातीसाठीचा निधी इतरत्र वळवला जात आहे याबाबत स्वतः सामाजिक न्याय मंत्री जाहीरपणे बोलत आहेत हा राज्यातील अनुसूचित जाती जमातीवर केलेला राज्य सरकार पुरस्कृत अन्याय आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्नाटक,आंध्र,तेलंगणा राज्यांप्रमाणे कायदा करून हा निधी इतरत्र वळवला जाणार नाही याची खात्री द्यावी अशी मागणी दिनांक ४/७/२०२५ रोजी मुंबईत आंबेडकर भवन येथे झालेल्या आयबीसेफ व इतर समाज संघटना,कार्यकर्ते यांच्या बैठकीत राज्य सरकारला करण्यात आली आहे यावेळी शैक्षणिक सवलती,पदोन्नतीतील आरक्षण,आणि एकूणच मागासवर्गीयांची प्रगती,विकास ह्या करीता अर्थसंकल्पातील अनुसूचित जाती जमातीचा निधी(वाटा)अतिशय महत्त्वाचा आहे ह्या करीता राज्य सरकारने १९७३ साली तत्कालीन विधान परिषदेचे सभापती वि.स.पागे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.

समितीचा अहवाल विधिमंडळासमोर ठेवण्यात आला होता त्यावर चर्चा करून अनुसूचित जातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १५ टक्के निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला व तसा शासन निर्णय २१ जून १९७९ रोजी काढण्यात आला आहे त्यामुळे राज्य सरकारने ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे त्याकरिता हा निधी(आमचा वाटा)इतरत्र वळवला जाणार नाही याकरिता कायदा करून अनुसूचित जाती जमातींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकार सक्षम आहे असे दाखवून दिले पाहिजे असे बैठकीच्या माध्यमातून आयबीसेफच्या वतीने सरकारला आवाहन करण्यात येत आहे त्याकरिता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर १५ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे दुपारी १-०० वाजता धरणे आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले.आयबीसेफचे अध्यक्ष सुनिल निरभवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत सरचिटणीस अँड.एस.के भंडारे,कोषाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे,प्रा. संजय अभ्यंकर,सौ.अस्मिता अभ्यंकर,दीपक दीपंकर,अंबरसिंग चव्हाण,अँड.बुद्ध भूषण राजरत्न,संदीप सातपुते,संजय गांगुर्डे,आदेश जगधने, शाहिर अशोक कांबळे,गौतम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती आयबीसेफचे सरचिटणीस एस. के.भंडारे यांनी दिली आहे.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!