बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे) “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
तौरल इंडिया प्रायव्हेट.लि.कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांचा संघर्ष आणि प्रकल्प तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असुन चाकण औद्योगिक वसाहतीमधील तौरल इंडिया प्रा. लि.या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन प्रकल्पास खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि.कंपनी येथे सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी गित्ते यांनी त्यांचे स्वागत केले.दरम्यान भरत गित्ते यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि.या कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केले असून ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांनी औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली असून येणाऱ्या काळात उद्योजक भरत गिते यांचे औद्योगिक क्षेत्रातील कार्य नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन खा.शरदचंद्रजी पवार यांनी यांनी या प्रसंगी बोलताना केले .

खा.शरदचंद्रजी पवार साहेबांची उपस्थिती ही आम्हां सर्वांसाठी ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत असल्याचे प्रतिपादन उद्योजक भरत गिते यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले आहे.तौरल इंडिया प्रायव्हेट.लि.कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांच्या तौरल इंडिया प्रायव्हेट.लि.कंपनी येथे देशाचे ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.त्यांचे बीड व परळीचे भूमिपुत्र ॲल्युमिनियम मॅन भरत केशवराव गिते यांनी स्वागत केले असून औद्योगिक क्षेत्रात विविध विषयावर सखोल या प्रसंगी चर्चा केली. गित्ते यांच्या कार्याचे कौतुक करत या प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

भरत गिते यांनी जर्मन कंपनीसोबत करार करून तब्बल ७००ते ८०० लोकांची रोजगार निर्मिती करणारा उद्योग या ठिकाणी सुरू केला असून २०१३ पासून ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.सामान्य घरातून आलेल्या भरत गिते यांनी कष्ट, मेहनतीच्या बळावर उद्योजकतेत मोठं यश संपादन केलं असून त्यांचे कार्य निश्चितच सर्व तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी असल्याचे खा.शरदचंद्र पवार साहेब यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.खा.शरदचंद्र पवार साहेब यांनी संस्थापक भरत गिते यांच्याशी संवाद साधत त्यांचं कार्य, दृष्टिकोन आणि उभारणीच्या प्रवासाची सखोल माहिती जाणून घेउन खा.शरदचंद्र पवार साहेब म्हणाले,”या ठिकाणी येण्याआधी भरत गिते यांच्याशी भेट झाली होती.त्यांनी त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती माझ्यापुढे मांडली.मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल काही लोकांकडून पूर्वीही ऐकलं होतं.त्यांच्या कार्यपद्धतीनं पवार साहेब प्रभावीत झाल्याने त्यांचा प्रकल्प प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली . त्यामुळे मी आज इथे आलो असून पुढे बोलताना पवार साहेबांनी महाराष्ट्रातील औद्योगिकीकरणाच्या वाटचालीवर भाष्य केलं.त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी उद्योग उभारले खरे,पण त्यामागचा उद्देश इंग्लंडमधील कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल भारतातून घेऊन जाण्याचा होता,असे सांगितले.

त्यांनी स्पष्ट केलं की “स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात.त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी,महाराष्ट्र फायनान्स कॉर्पोरेशन,महाराष्ट्र विद्युत मंडळ यांसारख्या संस्थांची स्थापना झाली.ज्यामुळे राज्यात औद्योगिक पाया मजबूत झाला.त्यानंतर माझ्यासह वसंतराव नाईक,वसंतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वात decentralised (विकेंद्रित)औद्योगिक धोरण राबवण्यात आलं.याच संदर्भात त्यांनी भरत गिते यांच्या प्रवासाचं विशेष कौतुक केलं. मराठवाड्याने निजामशाहीचा संघर्ष अनुभवला आहे.परळी/बीडसारख्या भागात नैसर्गिक अशा परिस्थितीतून झगडत पुढे आलेल्या,संघर्षातून तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तींमध्ये भरत गिते यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.त्यांनी जर्मनीत जाऊन तांत्रिक शिक्षण घेऊन तेथे नोकरी केली.आणि त्या अनुभवाचा उपयोग करत शून्यातून एक अत्याधुनिक प्रकल्प चाकणमध्ये उभा केला.ही गोष्ट प्रेरणादायी आहे. तसेच त्यांनी उद्योग,शेती आणि आयटी क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा मागोवा घेत, पिंपरी-चिंचवड,चाकण,रांजणगाव, शिरूर,बारामती,इंदापूर आणि भिगवन भागात झालेल्या औद्योगिक विकासाबद्दलही समाधान व्यक्त केलं. आज या ठिकाणी मी जे पाहिलं,ते खरोखरच आशादायक आहे,भरत गिते यांचा उद्योग या भागातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, याची मला खात्री आहे असेही त्यांनी शेवटी नमूद केलं.ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची तौरल इंडिया प्रा.लि.येथे झालेली सदिच्छा भेट ही आम्हा सर्वांसाठी ऐतिहासिक आणि गौरवाशाली असल्याचे प्रतिपादन संस्थापक भरत गित्ते यांनी या प्रसंगी व्यक्त केलं.खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे स्वागत करताना म्हटलं,साहेब,आपण स्वतः येथे आलात,त्याबद्दल मन:पूर्वक आभार ! आजचा दिवस हे तौरल इंडियाच्या इतिहासातील एक उत्सवाचा आणि ऊर्जेचा क्षण आहे.आपल्या दूरदृष्टीतून औद्योगिक,सहकारी आणि सामाजिक क्षेत्रात जे कार्य घडलं आहे, त्यातूनच आधुनिक महाराष्ट्राची घडण झाली आहे.आपल्या निर्णयक्षम नेतृत्वाचा ठसा गेल्या ५०-६० वर्षांच्या प्रत्येक टप्प्यावर स्पष्टपणे जाणवतो .

तौरल इंडियाच्या प्रवासाविषयी सांगताना,गिते म्हणाले की, केवळ १० कर्मचाऱ्यांपासून २०१३ साली या कंपनीची सुरुवात केली आणि आज ती नवभारत घडविण्याच्या दृष्टीने अॅल्युमिनियम कास्टिंग पुरवठा करणारी एक विश्वासार्ह कंपनी बनली असून माझी जन्मभूमी मराठवाडा-ही संघर्षाची भूमी आहे,पण तितक्याच ताकदीचीसुद्धा. त्या मातीतूनच एक उद्योगपती म्हणून घडू शकलो,हे सहज शक्य नव्हतं.ती एक प्रकारची अग्निपरीक्षा होती.मात्र आपण आमच्या सारख्या तरुणांसाठी एक मराठवाडा व्हिजन’तयार केलात तर अनेक तौरल इंडिया घडू शकतात.शेवटी त्यांनी पवार साहेबांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केला.आणि पुढील प्रेरणादायी सहकार्याबद्दल आशा व्यक्त केली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांशी/सर्व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला तसेच ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून उपस्थितीमध्ये खा.निलेश लंके,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,रामराव गित्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते .साहेब,आपण स्वतः येथे आलात, त्याबद्दल मन:पूर्वक आभार,आजचा दिवस हे तौरल इंडियाच्या इतिहासातील उत्सवाचं क्षण असुन आपल्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक बदल घडले.आज आपण आलात यामुळे आम्हा सर्वांना नवचैतन्य, ऊर्जा व प्रेरणा मिळाली असल्याचे भरत गीते,संस्थापक,तौरल इंडिया प्रा.लि.यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.मराठवाड्यासारख्या संघर्षमय भूमीतून आलेले भरत गिते यांनी जर्मनीत ज्ञान मिळवून शून्यातून उभारलेला हा प्रकल्प आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरेल असे प्रतिपादन शरदचंद्रजी पवार खासदार साहेब यांनी व्यक्त केले.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!