आपला जिल्हा
Trending

परिवर्तन एक लोक चळवळीच्या भीमजयंती विशेषकाचे प्रकाशन 

(उल्हासनगर)दि.२७एप्रिल२५ प्रतिनिधी-राहुल हांडोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

संपादक राजकुमार सुर्वे संपादित परिवर्तन एक लोक चळवळीच्या भीमजयंती विशेषकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.अध्यक्षस्थानी डॉ मिलिंद रणवीर होते.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ.देवराम मनवर आपल्या भाषणात म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या राज्य समाजवादाची अंमलबजावणी झाली पाहिजे.उद्योग धंदे हे सरकारच्या मालकीचे असावेत तसेच प्रायव्हेट सेक्टर सुद्धा चालू ठेवावेत.हाच धागा पकडून अध्यक्ष डॉ मिलिंद रणवीर म्हणाले की, राज्य समाजवाद म्हणजे जमीन सरकारी असावी,ती सर्वांना समान वाटून दयावी. बी बियाने सरकारने पुरवावेत असे ही रणवीर म्हणाले.कवी नारायण सोनकांबळे म्हणाले की,१९८२ साली उल्हासनगरला बौध्द धम्म परिषदेचे आयोजन केले होते.जागतिक धम्मगुरू भदंत आंनद कौसल्यायन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्या नन्तर अल्पवधीत त्याचे निधन झाले. कौसाल्ययन यांची ती शेवटची धम्म परिषद ठरली.या परिषदेचे आयोजन राहुल हंडोरे,डी.डी.वाघमारे आणि आम्ही केले होते.

सेवानिवृत्त क्रीडा जिल्हाधिकारी प्रदीप ढोके उपस्थित होते त्यांच्या हस्ते भीमजयंती विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले.डॉ.गजपाल इंगोले यानी शुभेच्छा दिल्या.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर सह सचिव पदावर राहुल हंडोरे यांची निवड झाली त्या बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.तसेंच कार्यक्रमाला नियमित हजेरी लावणारे कालकथित प्रा.डॉ.अरुण अहिरराव,कवी लक्ष्मण अभंगे,वसुंधरा मधाले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक परिवर्तन एक लोक चळवळीचे प्रमुख पत्रकार राजकुमार सुर्वे यांनी केले.सूत्रसंचालन युवराज भगत यानी केले तर आभार प्रदर्शन दिपक सोनेने यांनी केले.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!