Uncategorized
रिपाई राज्य कार्यकारणीवर राहुल हंडोरे यांची निवड.
(मुंबई)दि.२६एप्रिल,प्रतिनिधी-मनिलाल डांगे“प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री,नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने राहुल हंडोरे यांची रिपाई महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर सह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे आणि प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र आज मुंबई येथे राहुल हंडोरे यांना प्रदान करण्यात आले.





