आपला जिल्हा
सायगाव तलाठी कार्यालय पाडल्या प्रकरणी चौकशी समिती काय कारवाई करणार याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष.
बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे) “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील तलाठी कार्यालयाची ईमारत सरपंच कैलास छबु मरके यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे संपूर्ण ईमारत पाडून शासनाचे व जनतेचे रु ९ ते १० लाख रुपयाचे नुकसान केल्याबाबतची तक्रार महेंद्र कचरू मस्के,शेहबाज अली मजाज अली,आसेम अली माहपेज अली उस्मानी,रफिक कुरेशी,फैसल मिर्झा अशफाक खतीब, हिदायत सादेक अली यांनी केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग,महसूल विभाग, पंचायत समिती च्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती बुधवार दिनांक १६ रोजी सायगाव येथे आली होती.१९९० ला बांधलेली तलाठी कार्यालयाची इमारत ग्रामपंचायत मध्ये वेणार या नावे नोंद आहे ही इमारत लोकनियुक्त सरपंच कैलास छबू मस्के यांनी कुठल्याच कार्यालयाची परवानगी न घेता ही इमारत पाडली अशी तक्रार आहे. या ठिकाणी अंगणवाडी क्र ४ ही नोव्हेंबर पर्यंत चालू होती अशी माहिती चौकशी समिती ला अंगणवाडी सेविकेने दिली आहे तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांनी तलाठी कार्यालय पाडण्याचा किंवा पडलेले मटेरियल बाजूला सारण्याचा कुठलाही ठराव घेतला नसल्याची माहिती चौकशी समितीला दिली आहे.





