(अंबरनाथ)दि.६प्रतिनिधी-राहुल हांडोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तपत्र.
अंबरनाथ पूर्वेला गॅस गोडाऊन समोर,महालक्ष्मी नगर येथे डॉ.जाणू मानकर यांनी सुरु केलेल्या शिवशाही हॉस्पिटलचे उदघाटन पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे यांचे हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी डॉ.मंदाकिनी आमटे आणि सुप्रसिद्ध गायिका पुष्पा पाकधरे उपस्थित होत्या.अंबरनाथ मध्ये प्रथमच नुरोक्रिटिकेअर मल्टीस्पेशायलीस्ट शिवशाही हॉस्पिटलचे उदघाटन झाले.या प्रसंगी बोलताना पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे म्हणाले की,आम्ही चंद्रपूर सारख्या आदिवासी विभागात निरपेक्ष भावनेने कुष्ठरोगी आणि आदिवासी यांची सेवा केली.आदिवासी आणि जंगली जनावर यांच्या जीवनात फारसा फरक नसतो.ज्या ठिकाणी लाईटची सोय नव्हती,टेलिफोन नव्हते,रस्ते नव्हते अशा आदिवासी दुर्गम भागात हॉस्पिटल सुरु केले.तरुणांना प्रेरणा दिली.शाळा सुरु केली.आदिवासी मध्ये आरोग्य,शेती आणि शिक्षण या विषयी जागृती केली.

या विभागात एका आदिवासी इसमावर अस्वलाने हल्ला केला होता,डोक्याची पूर्ण कवटी निघाली होती.कुठल्याही शस्रक्रियाचे साधन नसताना एक मोठी सुई गरम करून जवळपास शंभर टाके घातले आणि आदिवासीचे प्राण वाचविले.परंतु डोळ्यावर मोठी जखम झाल्यामुळे त्याला दिसायला कमी झाले. जंगलात अन्न गोळा करायला त्याला जमले नाही.हिंश्र प्राण्यांच्या हल्यातून त्याला वाचविले परंतु तो आदिवासी इसम भुकबळीने मेला अशी सत्यकथा प्रकाश आमटे यांनी कथन केली.
Dr.J.J.Mankar.
M.D.DCH
President -Shivsahi Hospital AMBARNATH
डॉ.जे.जे मानकर प्रास्तविक भाषणात म्हणाले की,अंबरनाथ येथे पुरातत्व खात्याचे शिवमंदिर आहे,तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेऊन हॉस्पिटलचे नाव शिवशाही ठेवले.या पुढे अंबरनाथच्या कुठल्याही पेशन्टला बाहेर जावे लागणार नाही.मुख्यमंत्री सहायता निधी,महात्मा फुले जनआरोग्य सेवेचा लाभ शिवशाही हॉस्पिटल मध्ये मिळेल. डिपॉसिटं साठी कुणाचीही अडवणूक होणार नाही याची मी ग्वाही देतो असेही डॉ.मानकर म्हणाले.

या प्रसंगी अंबरनाथचे प्रसिद्ध डॉक्टर एस.व्ही देशपांडे,डॉ गणेश राठोड(कोविड योद्धा)डॉ.मुंदडा सर,डॉ.नरेंद्र शेट्टी(त्वचा रोग तज्ञ्)डॉ.विजय पिल्ले (हृदयरोग तज्ञ्) डॉ हरीश लॅपसिया(बालरोग तज्ञ्)यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ.अविनाश गव्हाणे(स्त्री रोग तज्ञ्)
यतीन भिसे (नेत्ररोग तज्ञ्)चंद्रकांत साळवे (बालरोग तज्ञ्)डॉ.सुजाता मानकामे,डॉ.उषा माहेश्वरी,डॉ.प्रमोद बेलापुरे,डॉ.संदीप साठे,डॉ राहुल चौधरी,डॉ.प्रतीक्षा गायकवाड आदींना डॉ प्रकाश आमटे,डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.







