बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)
आष्टी तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे स्थायिक झालेले शिक्षणप्रेमी/ उद्योजक आदरणीय हरिभाऊ शिवलिंग लगड (सर)यांनी रोडेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा या दोन्ही शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत RO Water Filter उपलब्ध करून दिले.हरिभाऊ शिवलिंग लगड(सर)हे रोडेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत मदतीचा हातदिला असूनत्यांच्या या सामाजिक व शिक्षणप्रेमी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ही मदत आमच्यासाठी अत्यंत मोलाची असल्याचे रोडेश्वर विद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे यु.आर.सर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.पुढे बोलताना सांगितले की २६ जानेवारीला रोडेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस तसेच शिवजयंतीला दोन्ही शाळांना साऊंड सिस्टिम दिली असून पिंपरखेड येथील जिल्हा परिषद शाळेस विद्यार्थ्यांसाठी संगणक साहित्य उपलब्ध करून दिले असल्याचे या प्रसंगी बोलताना सांगितले.

शिक्षण प्रेमी-उद्योजक यांच्या उदार सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने हरिभाऊ शिवलिंग लगड(सर)यांचे स्वागत करण्यात येऊन विद्यालयाच्या वतीने आभार मानले. त्यांच्या या समाजप्रिय कार्यातून समाजासाठी इतरांना प्रेरणा मिळावी अशी भावना या प्रसंगी मुख्याध्यापक गव्हाणे यु.आर.सर यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली असुन रोडेश्वर विद्यालय/जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा/पिंपरखेड जिल्हा परिषद शाळा व सर्व स्तरातून हरिभाऊ शिवलिंग लगड(सर)शिक्षण प्रेमी–उद्योजक यांचे आभार व्यक्त होत आहेत .
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!