मनोरंजनमहिला विशेष
दोन घटस्फोट व ६ नाती अनुभवल्यानंतर वयाच्या ६२ व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री “कुनिका कपुर” पुन्हा विवाहबंधनात अडकणार..!

“संपादकीय”
मनोरंजन विश्वातील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरते. अशाच एका वादळी आयुष्याचा सामना करणारी आणि आता वयाच्या ६२ व्या वर्षी पुन्हा नव्याने संसाराची स्वप्ने पाहणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे कुनिका सदानंद (ज्यांना कुनिका कपूर म्हणूनही ओळखले जाते). अभिनयासोबतच वकील म्हणूनही आपली ओळख निर्माण केलेल्या कुनिका यांनी बिग बॉस १९ या लोकप्रिय शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कुनिका सदानंद यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबाबत मोठे खुलासे केले आहेत.त्यांनी अत्यंत मोकळेपणाने मान्य केले की त्यांच्या आयुष्यात एकूण ६ पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते.या प्रवासात त्यांनी २ लग्न,२ लिव्ह-इन रिलेशनशिप आणि २ शॉर्ट टाईम रिलेशनशिप अनुभवले आहेत.दुर्दैवाने त्यांचे दोन्ही विवाह फार काळ टिकू शकले नाहीत आणि अखेर त्यांना दोन घटस्फोटांना सामोरे जावे लागले.त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत चर्चित अध्याय म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड गायक कुमार सानू यांच्यासोबतचे त्यांचे नाते.कुनिका यांनी स्वतः बिग बॉस च्या घरात खुलासा केला होता की,त्या अनेक वर्षे एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या.मात्र,त्या नात्यात त्यांना केवळ विश्वासघात मिळाला.
दोन अयशस्वी विवाहांनंतरही त्यांची मातृत्वाची जबाबदारी मोठी होती. पहिल्या पतीपासून त्यांना अरिहंत कोठारी हा मुलगा आहे, तर दुसऱ्या पतीपासून अयान लाल हा मुलगा आहे.या दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी कुनिका यांना प्रदीर्घ आणि मोठा कायदेशीर संघर्ष करावा लागला.सिंगल मदर म्हणून दोन्ही मुलांना एकहाती वाढवताना त्यांच्या वाट्याला अनेक अडचणी आल्या,मात्र त्यांनी अत्यंत खंबीरपणे प्रत्येक संकटावर मात केली.
“चौकट”
***********************
कनिका सदानंद यांचा हा प्रवास एका स्त्रीच्या खंबीरपणाचे आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याच्या धाडसाचे उत्तम उदाहरण आहे.वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेमाची आणि आधाराची अपेक्षा ठेवणे हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार आहे, हेच त्यांच्या या स्पष्ट भूमिकेतून अधोरेखित होते.

