महाराष्ट्र

एस.टी.च्या ताफ्यात राजमाता जिजाऊ नावाची नवीन बस सेवा.

मुंबई/दि.९ प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तपत्र.

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या ताफ्यात लवकरच नव्या बसेस येणार आहेत.राज्यात एस.टी.च्या नव्या बसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण होणार आहे राज्यातील परिवहन विभागाने माहिती दिली आहे.आता राज्यात एसटीच्या नव्या बसेसचे नामकरण राजमाता जिजाऊ असे करण्यात येणार आहे.

राज्यातील लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये,यासाठी ३ बाय २सीट असलेले ५५ लोक बसतील अशी अत्याधुनिक बसेस खरेदी राज्यात खरेदी करण्यात आल्या आहेत.या नव्या बसेसना स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले आहे,अशी माहिती राज्याचे परिवहन विभागाने दिली आहे.या बसेस मार्च २०२६ या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगातील या महाराष्ट्रात नवीन एसटी बसेस आणल्या आहेत.या बसेस प्रवासात आरामदायक असणार आहेत.

राज्यात राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ एस.टी.च्या नवीन बसेसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण केले आहे.राज्यात एसटीने यापूर्वी शिवनेरी,शिवशाही,शिवाई, यशवंती,हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी पाहिले आहे.आता त्यात एक नवीन एस.टी बस येणार आहे.या नवीन बस आल्याने लांबल्या मार्गातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी असताना,नव्या बसेसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील.म्हणजेच लांबच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे.त्यामुळे ही नवीन बससेवा सध्या दोन शहरात अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करणार आहे,असे राज्यातील परिवहन विभागाने म्हटले आहे.राजमाता जिजाऊ हे नाव केवळ नामकरण नाही, तर प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधिलकीचे एक सन्मानचिन्ह आहे.राज्यात लवकरच या नवीन बसेस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील असे,परिवहन विभागाने सांगितले आहे.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!