Maharashtraमाहिती तंत्रज्ञान
एस.टी.चे अर्धतिकीट,फुकट प्रवास १ मार्चपासून बंद 😳
फुकटे बसायचे आणि तिकीट काढणारे उभे राहूनच जायचे

(मुंबई)दिं.२३प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठांना फुकट प्रवास होता,मात्र आता १ मार्चपासून हे सर्व बंद होणार आहे. यासाठी शासनाने एक एनसीएमसी कार्ड (NCMC Card) देण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व सवलतधारी प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.हे कार्ड असेल तरच एसटी तिकिटात सवलत मिळणार आहे. यावरून प्रत्यक्षात योजना बंद होणार नसली तरी त्याचा थेट लाभ प्रवाशांना घेता येणार नाही.
हे कार्ड काढण्यासाठी एवढ्या अटी घालण्यात आल्या आहेत की,ते कार्ड सहजासहजी मिळेल की नाही आणि अर्धे तिकीट,फुकट प्रवासाची सवलत घेणाऱ्यांना ते कार्ड काढायला,टॉपअप रिचार्ज करायला जमेल की नाही ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कुठे मिळणार नवं कार्ड ?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दि.१३ फेब्रुवारी२०२६ रोजी सर्व विभाग नियंत्रकांना परिपत्रक पाठविले आहे. त्यामध्ये एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) बंधनकारक करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
कुठे मिळणार: हे कार्ड कोणत्याही बस स्थानकावर मिळणार आहे.
स्वरूप: हे कार्ड प्रीपेड वॉलेट सारखे काम करणार असून १९९ रुपये त्याची किंमत आहे.







