आपला जिल्हा
Trending
अंबरनाथ शहरात सुसज्ज ”प्राणीगृह”(Animal Shelter)उभारण्याची नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांची नगरपरिषदेकडे मागणी
श्री.निखिल सुनील चौधरी-नगरसेवक,अंबरनाथ प्रभाग क्रमांक-१९ मोबाईल-९९६०७९९८४५
(अंबरनाथ)दिं.२०प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
अंबरनाथ शहरात वाढत असलेली मोकाट प्राण्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता,अंबरनाथ नगरपरिषदेने शहरात एक सुसज्ज आणि स्वच्छ ‘प्राणीगृह'(Animal Shelter)उभारावे,अशी आग्रही मागणी नगरसेवक श्री.निखिल सुनील चौधरी यांनी केली आहे.
या संदर्भात निखिल चौधरी यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना अधिकृत पत्र दिले आहे.या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की,शहरातील गृहनिर्माण संकुले,शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून,यामुळे लहान मुले,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.अनेक ठिकाणी नागरिकांकडून प्राण्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
प्राणीगृहाचे प्रस्तावित फायदे:-निखिल चौधरी यांनी सुचवलेल्या या उपक्रमामुळे पुढील फायदे अपेक्षित आहेत:




