महाराष्ट्र ग्रामीण

केज तालुक्यातील उतरेश्वर पिंपरी गावात जमिनीच्या वादातून चुलत भावानेच केला चुलत भावाचा खून.

पोलीसांनी फक्त एक तासात पकडला आरोपी,पोलीसी खाक्या दाखवताच आरोपी कबूल.

(Beed)केज,दि.५प्रतिनिधी-गोरख मोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

जमिनीच्या वादातून रक्ताच्या नात्याचा अंत; केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरीत चुलत भावानेच केला भावाचा निर्घृण खून
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.जमिनीचा वाद आणि घरगुती कारणावरून चुलत भावानेच आपल्या सख्ख्या चुलत भावाचा गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार घडला असून,या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.रक्ताच्या नात्यातच असा दुर्दैवी प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उत्तरेश्वर पिंपरी येथील विकी उर्फ अण्णा रावसाहेब चंदनशिव(वय२५वर्षे)आणि त्याचा चुलत भाऊ महेश उत्तरेश्वर चंदनशिव(वय२५वर्षे)यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते.याच वादाचा राग मनात धरून आरोपी महेश याने शुक्रवारी रात्री विकीला केवड आणि पिंपरी या दोन गावांच्या सीमेवर असलेल्या एका शेतात नेले.तिथे गेल्यानंतर आरोपीने विकीला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून त्याची निर्घृण हत्या केली.हत्येनंतर आरोपीने मृतदेह रस्त्यावरच टाकून तिथून पळ काढला होता.

शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका तासाच्या आत आरोपी महेश चंदनशिव याला शोधून काढले आणि त्याला बेड्या ठोकल्या.पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून,घरगुती कारणे आणि जमिनीच्या(भूखंडाच्या)वादातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक,सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच मयताच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला.सध्या या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस करत असून गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original)आहे.फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!