आपला जिल्हा
प्रभाग २० मध्ये परिवर्तनाचे वारे….!
अनुक्रमांका नुसार प्रभाग २० हा उल्हासनगर महापालिकेतील शेवटचा प्रभाग आहे. या प्रभागात अ/ब/क असे तीन उमेदवार आहेत.

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक
९८२२९०२४७०
संपादकीय
डम्पिंग ग्राउंड,पाण्याची समस्या,आरोग्य विषयक सुविधा व अतिदाट वस्ती असलेला हा उल्हासनगरच्या सीमेवरील प्रभाग आहे.या प्रभागात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रधान पाटील,शविकास पाटील व विजय पाटील यांचे साम्राज्य आहे.हा मतदारसंघ म्हणजे पाटील वाडाच! यात पाटील परिवारातील भाऊबंधकी ही गाजत असते.या प्रभागातून प्रधान पाटील हे 2007 मध्ये शिव सेनेच्या वतीने प्रथम निवडून आले.2012 मध्ये विजय चाहू पाटील हे भाजपच्या वतीने तर अपेक्षा विकास पाटील ह्या शिवसेनेच्या वतीने विजयी झाले होते.2017 च्या निवडणुकीत विजय चाहू पाटील भाजपा,आकाश परशुराम पाटील व विकास परशुराम पाटील हे शिव सेनेच्या वतीने निवडून आले होते.याचा अर्थ 2007 पासून आजतगायत गेली 20 वर्षे पाटील कुटुंबियांची येथे सत्ता आहे.
गेल्या वीस वर्षात या प्रभागात लक्षवेधी असा कोणताच विकास झाला नाही.अपेक्षा पाटील तर 2012 च्या टर्म मध्ये महापौर देखील होत्या.येथून शिव सेनेचे आमदार खासदार सातत्याने निवडून येतात.तरी येथील डम्पिंग ग्राउंड हटविण्यात कोणालाही यश आलेले नाही. या डम्पिंग ग्राउंड मुळे शहरभरातील कचरा येथे डोंगरा सारखा रचला जात आहे. अनेक वेळा तो जाळला जातो किंवा आग लागते,त्यामुळे येथील परिसरात विषारी वायू पसरतो,आरोग्य विषयक गंभीर समस्या निर्माण होतात,दुर्गंधी मुळे श्वसनाचे आजार होतात.
सागर कैलास तेजी(क)
येथील अनधिकृत बांधकामे नियमित करता आलेली नाहीत,क्लस्टर योजना अंमलात आलेली नाही, पाणी टंचाई बरोबरच अनियमित पाणी पुरवठा या सारख्या अनेक समस्या येथील लोकांना भेडसावत आहेत.या समस्या सोडवण्यात या पाटील बंधूना सपशेल अपयश आलेले आगे. त्यामुळे येथे परिवर्तनची लाट आलेली आहे. मावळते नगरसेवक आपले स्थान टिकवण्यासाठी साम,दाम,दंड व भेद नीतीचा अवलंब करीत असले तरी मतदार त्यांना बधणार नाहीत,इतकी चीड मावळत्या नगरसेवकांबद्धल नागरिकांत आढळून येते.
सौ.करिष्मा भरत चोळेकर(ब)
या वेळी प्रभाग क्र.20 “क” मधून प्रधान धर्मा पाटील व विजय चाहू पाटील हे अनुक्रमे भाजपा व शिंदे शिवसेनेकडून आपसात भिडत आहेत.या दोन पाटलांच्या साठमारीत सागर तेजी हा उबाठा शिवसेनेचा तरुण व तगडा उमेदवार बाजी मारून जाईल.तोच प्रकार ब मध्ये आहे.येथे माजी महापौर राहिलेल्या अपेक्षा विकास पाटील व ललिता प्रधान पाटील या अनुक्रमे शिवसेना शिंदे कडून एकमेकींच्या झिंज्या ओढण्यात दंग आहेत.त्याचा लाभ उबाठा शिव सेनेच्या तरुण व धडाडीच्या उमेदवार करिष्मा चोळेकर यांना होईल व त्या करिष्मा घडवून विजयी होतील,असे दिसते.”अ” मध्ये माजी नगरसेविका कविता सुरेश पाटील व जयश्री जानू मानकर यांच्यात लढत आहे.कविता किंवा सुरेश पाटील यांचा फारसा प्रभाव उरलेला नसल्याने डॉ.जानू मानकर यांच्या सौ.जयश्री मानकर यांच्या गळ्यात विजयश्री माळ घालणार ! असे वातावरण आहे.
सौ.जयश्री जानु मानकर(अ)








