आपला जिल्हा

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिंदे सेना,भाजपा,उबाठा सेना व राष्ट्रवादीत चौरंगी लढत होईल.बंडखोरीच्या भीतीने यादी लांबणीवर !

दिलीप मालवणकर-ज्येष्ठ पत्रकार-9822902470

(उल्हासनगर)दिं.२७प्रतिनिधी,संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

उल्हासनगर महापालिका निवडणूक आठ वर्षानंतर होत आहे.त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठीकडे तगादा लावला आहे.गेल्या साडेतीन वर्षात बरीच राजकीय उलटापालट झाली.शिव सेना व राष्ट्रवादी दोन भागात विभागली गेली.त्यामुळे भाजपाला बरकत आली.साम दाम दंड भेद व evm सेटिंगमुळे भाजप फुगत गेला.इतर पक्ष फोडून आपल्या दावणीला बांधणे हाच एक कलमी कार्यक्रम भाजपने देशभर राबवला.त्यांना साथ लाभली ती स्वायत्त मानल्या गेलेल्या निवडणूक आयोग,ED,व न्याय व्यवस्थेची.

या बळावर भाजपा शिंदे गटाने नगरपालिका निवडणुकीत बाजी मारली. याच पद्धतीने महापालिका निवडणुकीतही बाजी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.परंतु महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह असतो.प्रत्येक पक्षाने आपली ताकद अजमाविण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवली तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते.परंतू सध्या युती आघाडीचे सुगीचे दिवस असल्याने दोन/तीन वा चार पक्ष एकत्र येतात व आघाडी करतात.मोजक्याच जागा असल्याने जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरतो व नेत्यांची डोकेदुखी ठरते. त्यामुळे वर्षानुवर्षे निवडणुकीच्या आशेने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो.तिथूनच सुरू होतात बेडूक उडया. रातोरात इकडचा निष्ठावंत निसटून विरोधी पक्षाला जाऊन मिळतो.मग त्या पक्षात ही साठमारी सुरू होते.कानामागून आला आणि तिखट झाला,आल्या आल्या तिकीट घेऊन गेला,असे होते.त्यामुळे जी फाटाफूट होते त्यालाच गद्दारी व बंडखोरी म्हटले जाते.

 

मुंबई, ठाणे,कल्याण,उल्हासनगर पुणे पिंपरी चिंचवड भिवंडी सारख्या महापालिकांत याच युती आघाडीमुळे अनेक इच्छुक डावलले गेल्याने नाराज आहेत.ही नाराजीचा प्रत्येक पक्षाला भोवणार आहे.

उल्हासनगर महापालिकेचा विचार करता येथे भाजपा,मूळ शिवसेना,शिंदे यांची शिव सेना,काँग्रेस,रिपाई, वंचित,पाठोपाठ TOK व साईं पार्टी असे मुख्य पक्ष आहेत. गेल्या महापालिकेत भाजपा व शिव सेनेचा वरचष्मा होता.

भाजपा व TOK 33

शिवसेना 25

साईं पार्टी 11

राष्ट्रवादी पार्टी 04

रिपाई 02

PRP 01

BRP 01

काँग्रेस … …     01

आजवर सत्ता कोणाची असावी? याची किल्ली कलानी व इदनानी यांच्या हातात होती.कारण कोणतेही राज्यस्तरीय पक्षाने 39 हा जादूई आकडा गाठलेला नाही. अपवाद फक्त 1986 व 1992.आजही स्वबळावर बहुमत मिळवण्याची ताकद कोणत्याही पक्षात नाही.त्यामुळे TOK व साई पार्टी च्या कुबड्या घ्याव्या लागतात. भाजपचे चार खंदे नगरसेवक भाजपा सोडून TOK मध्ये गेल्याने पक्षाची ताकत कमी झाली आहे.TOK सोबत असेल तरच सत्तेचे गणित जुळते हे ठाऊक असल्याने शिंदेच्या शिवसेनेला कलानीची साथ त्यासाठीच घ्यावी लागत आहे.भाजपा व कलानीचे कधीच जमले नाही,त्यामुळे कलानी गट खासदारांच्या जवळचा झाला आहे.त्यामुळे उल्हासनगर मध्ये भाजपा हा एकाकी पडला आहे. दुसरीकडे मूळ शिवसेनेचा एकही नगरसेवक पक्षात शिल्लक उरलेला नाही.25 पैकी 23 आधीच शिंदे सेनेत गेले होते उरलेले छोटे बोडारे सपत्नीक भाजपात विलीन झाले. त्यामुळे उबाठा शिव सेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जाते. शेजारच्या अंबरनाथ व बदलापूर नगर पालिकेत शिव सेनेस खातेही उघडता आलेले नाही.गटबाजी करून शिवसेना कोणी संपवली हे जगजाहीर आहे.

आगामी निवडणुकीत भाजपा एकाकी लढत देत असली तरी त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार व माजी नगरसेवक आहेत. तसेच शिंदे सेनेसोबत गेम चेंजर कलानी व ईदनानी यांचे स्थानिक पक्ष आहेत. त्यामुळे शिंदे सेना व युतीतील घटक यांची ताकद जास्त आहे.उबाठा सोबत राष्ट्रवादी पवार असली किंवा काँग्रेस असली तरी त्यांची ताकद मर्यादित आहे.मात्र अंबरनाथ व बदलापूर इतकी वाईट परिस्थिती होणार नाही.उद्या सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. त्यानंतर बंडखोरी होईल.या बंडोबांना थंडोबा कसे करता येईल,ही चिंता सर्व राजकीय पक्षांना भेडसावत असल्याने उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब लावला जात आहे.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!