(मुंबई)दिं.१डिसेंबर,प्रतिनिधी-गोरख मोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) मुंबई महानगरपालिका निवडणूकीत ६०-७० जागा लढविणार आहे रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटातील नेत्यांशी चर्चा सुरू आहे त्या सर्वांना सोबत घेऊन किमान १०० जागा लढविण्याची तयारी आहे रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे असे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी सांगितले तसेच समविचारी पक्षांबरोबर विशेषतः डाव्या पुरोगामी विचारांच्या पक्षांच्या बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली तर निश्चितच पर्याय उभा राहू शकतो असेही पुढे भाऊ निरभवणे यांनी सांगितले आहे

रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा)मुंबई महानगरपालिका निवडणूकीत इच्छुक उमेदवारांची बैठक शनिवारी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे आझाद मैदान मुंबई येथील रावबहादूर एन शिवराज भवन ह्या केंद्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीत मुंबईतील पक्षाच्या वतीने महानगरपालिका निवडणूकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांना बोलावण्यात आले होते ह्या वेळी सर्व इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली तसेच जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा आपली मते मांडली पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सुरुवातीला प्रास्ताविक स्वरूपात पक्षाची भूमिका मांडली यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद साळवी,मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सलीम सय्यद,व संघटक सचिव तथा रिपब्लिकन कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश केदारे यांनी सुद्धा आपली मते मांडली.रिपब्लिकन कामगार संघटनेत दिपक जाधव,किरण जाधव,स्वातीताई हेळगावकर,आशाताई कांबळे यांना विविध पदांवर नियुक्ती पत्र देण्यात आली तसेच राजेंद्र मांजळकर यांना पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिली आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!