(बीड)दिं.२,प्रतिनिधी-बबलु सातपुते “प्रवासी संचार’ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
बीड जिल्हयासह मराठवाड्यात ऑगस्ट- सप्टेंबर महीन्यात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने हाहाकार उडाला होता, त्याच वेळी दिनांक २७/०९/२०२५ रोजी चौसाळा व परिसरात झालेल्या अतिवृष्टी पावसाने चौसाळा जवळील वाडवाना -पिंपळगाव रोडवरील नदीला पूर आला होता.मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्याच दिवशी रात्री चौसाळा येथील युवक स्वप्निल विक्रम शिंदे वय ३३ वर्ष याचे नदीपलीकडे घर/शेती असल्याने रात्री ९ वाजता मोटरसायकल वरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुलावरून जात असताना मोटरसायकल सहपुरात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी काही अंतरावर मोटरसायकल सापडली,यावरून तो पाण्यात वाहून गेला असल्याचा अंदाज त्याच्या नातेवाईकांना आला,त्याचा शोध घेतला असता सापडला नाही.

जिल्हा स्तरावरून शोध पथके पाचारण केले परंतु याचा शोध लागला नाही.हे पथके तीन दिवस शोध घेत होते परंतु कुठेच शोध लागला नाही.१५ ते २० कि.मी शोधले परंतु पथकाला त्यात अपयश आले.शेवटी शोध यंत्रणा बंद झाली,परंतु आज दिनांक २३/११/२०२५ रोजी चौसाळा बायपास जवळील पुलाच्या खाली एका खड्ड्यातील झुडपात एक मानवाच्या शरीराचा सापळा अडकलेला त्या परिसरातील ऊसतोड मजुरास व मासे पकडणाऱ्या व्यक्तीस तो दिसला,त्यांनी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीकडे मोबाईल द्वारे कळविले असता त्याचे नातेवाईक तात्काळ त्या ठिकाणी गेले व त्यांना त्याचे कपडे व खिशात मोबाईल अशा वस्तू मुळे ते प्रेत स्वप्नील शिंदे याचेच आहे अशी खात्री पटल्यानंतरच त्या प्रेतावर दिनांक २३/११/२०२५रोजी ०५ वाजता चौसाळा येथे अंत्यसंस्कार केले.स्वप्निलच्या मृतदेहाचा शोध तब्बल २ महिन्यांनी लागल्यामुळे सर्वच आश्चर्य वाटत आहे. स्वप्निल हा एकुलता एक होता त्याला एक सहा वर्षाचा मुलगा असुन स्वप्निल वाहून गेल्यानंतर अनेक नेत्यांनी त्याच्या घरी भेट देऊन शिंदे परिवाराचे सांत्वन केले. स्वर्गवासी स्वप्निल यांच्या पश्चात आई- वडील,पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्याचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!