आपला जिल्हा
आमदार सुरेश धस यांचे जाहिर आवाहन-आष्टी/पाटोदा/शिरूर कासार तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण तात्काळ NSC ट्रांसफार्मर साठी तात्काळ अर्ज करावे.

बीड जिल्हा(प्रतिनिधी–गोरख मोरे)
शेतीपंपाच्या ट्रान्सफॉर्मर वरील घरगुती वीज वापराचा भार कमी करण्यासाठी NSC योजने अंतर्गत तातडीने महावितरणा कडे अर्ज करा.न्यू सर्व्हिस कनेक्शन (NSC)ही नवीन योजना आता लागू झाली असून त्या अंतर्गत जर १० घरगुती वीज वापरणारे ग्राहक जर एकत्र आले तर त्यांना २५ KVA चा ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद आहे.जर २० ग्राहक एकत्र आले तर ६३ KVA आणि ४५ ग्राहकांच्या समूहाला देखील १०० KVA ट्रान्सफॉर्मर या योजनेतून मिळणार आहे.





