Maharashtra
Trending
१४ आक्टोबर बोधगया बौद्धमहाविहार मुक्ती मोर्चा ऐक्याची क्रांती ठरो.
समाजभूषण कर्मचारी दा.गा.पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन-उतमराव गायकवाड-9821907296

प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
हा प्रयोग यशस्वी झाल्यास मोठी क्रांती ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकते आज जरी विविध गटातटात विखुरलेला पक्ष व आबेडकरी चळवळ असली तरी सर्वाना कळून चुकले आहे.
महाराष्ट्र शासन कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कृत “उत्तमराव गायकवाड”
आपण कोणतीही भरीव सामाजिक चळवळ पुढे नेऊ शकत नाही एकत्र येणेच काळाची गरज आहे पक्ष फुटल्या नंतर ज्या घडामोडी झाल्या ज्यांनी आपल्या राहुट्या उभारल्या त्याचा फायदा काही अशी त्यांना झाला असेल पण समाजाचे नुसकान झाले या दुहीचा फायदा विविध राजकीय पक्षाने उठवला आज ते नेते कालबाह्य झालेले आहेत.फक्त इतिहास राहिला आलीकडच्या तरुण सुशिक्षित मंडळीना त्याची जाणीव झाली आहे ते आज जरी परिस्थितीनुसार विविध पक्षाकडे झुकले असतील तरी ऐक्यची जाणिव त्यांना होत आहे.
केंद्रीय समाज कल्याण मंत्री ना.रामदासजी आठवले.
तसे पाहिले महाराष्ट्रात ना.रामदास आठवले ऐड बाळासाहेब आबेडकर सोडता दुसरे भरीव नेते कोणी नाहीत त्यांचेही वय झालेले आहेत याची तरुणपिढीला जाणीव आहे, शिवाय ईतर समाज पक्षाप्रमाणे तरुण नेतृत्व तयार होत नाही ही शोकांतिका आहे म्हणून भविष्यात भावीपिढीसाठी आबेडकरी चळवळ तेवत ठेवण्यासाठी तिला धार निर्माण होण्यासाठी एकत्रीकरण महत्वाचे वाटते महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी मोर्चाच्या निमित्ताने सर्वाना बरोबर घेण्याचा प्रयन्त ना.रामदास आठवले यांनी सुरु केला आहे.उशिरा का होईना स्वातार्थ आहे ही पहिलीच वेळ आहे इतर पक्षात असलेल्या बौध्द कार्यकर्ते यांना निमंत्रण देऊन बोलविले नाही तर रिडल्स सारखे जे मोर्चे निघाले त्यात न आमंत्रण देता ईतरही पक्षातील लोक रस्त्यावर उतरलेच होते.
परंतु ना.रामदास आठवले यांनी खास लक्ष घातल्यामुळे काही संघटना कार्यकर्ते एकत्र आले हे नाकारता येत नाही असिच भूमिका सातत्याने राहिल्यास सद्याची देशातील बौद्धाची परिस्थिती पहाता लोकांनाही एकत्रित होणे गरजेचे वाटते चळवळीतील अनुभवी कार्यकर्ते मग ते कोणत्याही तटागटातील पक्षातील असोत नक्कीच प्रतिसाद देतील आणि यातूनच नवे नेतृत्व पुढे येईल असे वाटल्यास वावगं ठरणार नाही समाजाती विविध क्षेत्रातील मंडळी आहे त्यानी आपल्या कलागुणानी नाविण्य मिळविले आहे त्यांनाही निमंत्रित केले पाहिजे.ना.रामदासजी आठवले यांचा हा प्रयोग निच्शित यशस्वी होईल.








