बीड जिल्हा(प्रतिनिधी–गोरख मोरे)

आष्टी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जगदंबा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.जगदंबा देवी मंदिर हे गावच्या पूर्व दिशेला नदीकाठी असून या देवीच्या दर्शनासाठी या दिवशी गावातील जे नागरिक-माता भगिनी बाहेरगावी कामानिमित्ताने गेलेले असतात त्या सर्व जणांनी आवर्जून उपस्थिती लावली.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावातील सर्व नागरिक माता-भगिनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.रात्री गावातून पालखीची मिरवणूक/छबिना निघाला यावेळी पालखी गावातून प्रत्येक नागरिकाच्या दारातून जात असताना सर्व नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले.

यामध्ये ढोल,ताशा,लेझीम,झांज पथक आदी वाद्यांचा समावेश होता.यात्रा उत्सव शांततेत साजरा करण्यात आला असून शेवटी फटाकेची आतिषबाजी करण्यात आली.दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या नंतर दुपारपर्यंत साऊंड सिस्टिम वर महिलांचे नाच गाणे,डान्स झाला.यामध्ये महिला बरोबरच तरुण-युवक वर्गाने नाच गाण्याचा ठेका धरला होता.दुपारी दोनच्या नंतर कुस्त्यांचा जंगी सामना आयोजित केला होता.सायंकाळ उशिरापर्यंत कुस्त्यांचा जंगी सामना शांततेत रंगला होता.

या यात्रा उत्सवामध्ये पिंपरखेड- कुंभरवाडी ग्रुप ग्रामपंचायतील सर्व आजी-माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,युवक वर्ग,यात्रा उत्सव कमिटी सर्वांचा सहभाग दिसून आला असून अंभोरा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला असून पिंपरखेड येथील जगदंबा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात शांततेत संपन्न झाला.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!