आपला जिल्हा
उल्हासनगर शहर हा “Danger Zone” म्हणून काँग्रेसच्या वतीने जाहीर !

(ULHASNAGAR)प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
उल्हासनगर शहरातील रस्त्यांच्या जीव घेण्या खड्यां मुळे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्राला डेंजर झोन (संकट क्षेत्र)असल्याचे घोषणा व जन जागृती अभियान आज उल्हासनगर कांग्रेसच्या वतीने करण्यात आली.ह्या अंतर्गत टाउन हॉल रोड,उल्हासनगर ३ येथे सर्व प्रथम त्या रस्त्यावरील खड्यांना ऑइल पैंट नी सीमांकन केले व त्त्या रस्त्या मधील खड्यांची गणना केली,जेणेकरून वाहन चालकाना ते खड्डे स्पष्ट दिसतील आणि नागरिक अपघात टाळू शकतील, त्याच सोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात सूचना फलक घेऊन रस्त्याच्या चारी बाजूला उभे झाले ज्या मध्ये “संकट क्षेत्र, उल्हासनगर महानगरपालिका हद्द सुरू,“ “Danger Zone Enter at your own risk”,अपने सेहत और गाड़ियो का ख्याल ख़ुद रखें,कोई भी नुक़सान के लिए उल्हासनगर महानगरपालिका ज़िम्मेदार नहीं”असह्य प्रकार च्या सूचना दिल्या होत्या.
पत्रकारांशी बोलताना जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी माहिती दिली की मागील अनेक वर्षान पासून उल्हासनगर कांग्रेस च्या वतीने खराब रस्त्यां विरोधात अनेक आंदोलने केली ज्या मध्ये “डांबर खाते कोण “,झंडू बाम वाटप,सीमेंट दान आंदोलन अश्या विविध आंदोलनांचा समावेश आहे,आणि मे महिन्यात मोठे धरणे आंदोलन नेताजी चौकात येथे करण्यात आले,त्याचा उद्दिष्ट हाच होता की,पावसाळ्या आधी चांगल्या दर्जाचे रस्ते दुरुस्त करण्यात यावे जेणेकरून ऐन गणेशोत्सव,नवरात्री मध्ये नागरिकांना त्रास होणार नाही,परंतु प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केल्या मुळेच आज लोकांचे हाल होतं आहेत,एवढेच नव्हे तर काही लोकांनी आपला हयात जीव गमावला आहे.ज्येष्ठ नागरिकांना मणक्याच्या, महिलांना व सर्वच नागरिकांना विविध दुखापत झाले,रिक्षा चालक व वाहन चालक ह्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले.
तरी देखील प्रशासनाने ह्या विषय कडे गांभीर्याने लक्ष नाही दिले.
अनेक स्थानिक संगीतकारांनी ह्या वर गाणे बनवले,जे राज्य भर प्रचंड प्रसिद्ध झालेत तरी देखील प्रशासनाला ह्याची लाज वाटली नाही म्हणून काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षाची भूमिका निभावत प्रशासनाला जागे करण्यासाठी हे जण जागृती अभियान राबवले.
भारतीय जनता पार्टी आणि शिव सेना ह्या महानगरपालिका अनेक वर्षान पासून सत्तेत आहे व आज प्रशासकीय राज वाटीत केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता आहे परंतु त्यांच्या पक्षाचे नेते व आमदार मूलभूत सुविधा इथल्या नागरिकांना पुरवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत व ते फक्त गटबंधन करण्यात व्यस्त आहेत.




