(पैठण)प्रतिनिधी-प्रसाद ख्रिस्ती “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
जायकवाडी धरणाच्या समन्यायी पाणी वाटप धोरणात बदल करुन त्यात ०७ टक्के पाणी कपात सुचविणारा प्रमोद मांदाडे समितीचा अहवाल शासनाने फेटाळावा आणि यासंदर्भात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने विशेष अधिकाराचा वापर करून यासंदर्भातील मराठवाड्यातील जनतेचे आक्षेप नोंदवून घेण्यासाठी मराठवाड्याच्या सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात बैठक घेऊन आक्षेपकर्त्याचे म्हणणे ऐकून घ्यावेत, अशी मागणी पैठण येथील स्वराज्य जनजागृती परीषदेचे विश्वस्त विष्णू ढवळे यांच्यासह रामचंद्र आहूजा,शेख रईस, ॲड.संदीप शिंदे,गणेश जुंजे,ईश्वर मोरे, सुभाष काळे तसेच सामाजिक संघटनेचे संतोष गव्हाणे,रमेश शेळके,संतोष तांबे, दिनेश पारीख,किशोर तावरे,रमेश लिंबोरे, राहुल पगारे,नानक वेदी,प्रसाद ख्रिस्ती आदींनी केली आहे.

विभागीय महसूल आयुक्त हे मराठवाडा विकास विभागीय आयुक्त या पदावरही कार्यरत आहेत.त्यांनीही पाणी वाटपा संदर्भात मराठवाड्याच्या हक्कावर गदा येणार नाही व अन्याय होणार नाही, याबाबतची भुमिका समजून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी,मराठवाड्यातील जलतज्ञ, जल अभ्यासक व जलमिञांची बैठक घ्यावी.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!