शिरूर कासार येथे शिवसेनेच्या वतीने ठेवीदारांच्या पैशासाठी ज्ञानराधा बँकेसमोर अर्धनग्न आंदोलन.
पुढील आंदोलन मुंबई येथील विधान भवनामध्ये--खेडकर/मोरे.
बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे
शिरूर कासार येथे ज्ञानराधा बँकेच्या विरोधात शहरातील बंद असलेल्या बँकेच्या समोर ठेविधारासह शिवसेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुख परशुराम जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर,शिवसेना तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्यासह ठेवीदारांनी अर्धनग्न आंदोलन केले.
शिवसेनेच्या वतीने या ठेवीदारांच्या संदर्भात चार वेळा आंदोलने केली तरी सुद्धा या सरकारला,सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्यासह जिल्हाभरातील नेते मंडळींनी एकत्र येऊन ठेवीदारांचा प्रश्न सोडविणे गरजेचे असताना सुद्धा या सर्वांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले,विशेष म्हणजे आजपर्यंत जे ठेवीदारांच्या संदर्भात आंदोलने केले ते सर्व शिरूर कासार शहरातच करण्यात आली. या आंदोलनात दरम्यान पोलीस प्रशासन,महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारले असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
याची दखल मंत्रिमंडळाने घेऊन ठेवीदारांचा पैशाचा प्रश्न सोडवावा नाही तर,या नंतरचे पुढील आंदोलन मुंबई येथील विधान भवनामध्ये केली जाईल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर,शिवसेना तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्यासह ठेवीदारांनी या आंदोलना दरम्यान मंत्रिमंडळाला दिला.



