आपला जिल्हा

पैगाम मुर्दो मे भी जान डाल देता है ! जेष्ठ विचारवंत मा.अशोक लगाडे. 

(उल्हासनगर)दिं.७जुलै,प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे “प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

पैगाम सामाजिक संघटनेच्या अंबरनाथ-कल्याण युनिट च्या वतीने दिनांक ६ जुलै २०२५ रोजी उल्हासनगर येथे भव्य कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जेष्ठ विचारवंत व प्रसिद्ध वक्ते मा.अशोक लगाडे हे बोलत होते.आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणात त्यांनी उपस्थितांना अमुल्य मार्गदर्शन केले.त्यांच्या अनुभवी व अभ्यासपुर्ण शैलीतील बोलणे विचार करायला लावणारे होते.त्यांनी पैगाम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या सातत्यपूर्ण चाललेल्या प्रयासाबद्दल आनंद व्यक्त केला.तसेच आयोजकांचे आभार मानले.ते पुढे म्हणाले की,आपण बहुजन मोठ्या संख्येने असून देखील आपण अनेक समस्यांनी वेढलेले आहोत याबद्दल खेद वाटतो.तरीही पैगाम च्या माध्यमातून सामाजिक क्रांती येईल हे निश्चित आहे यात दूमत नाही.मी गेली अनेक वर्षे पैगाम चे कार्य पाहतो आहे.पैगाम चे नेते व कार्यकर्ते हे आपल्या निश्चित केलेल्या धेय्याकडे योग्य पद्धतीने वाटचाल करीत आहेत.एवढेच नव्हे तर पैगाम चा विचार हा मेलेल्याला सुद्धा जीवंत करतो असा आहे.त्यामुळे आपण सर्वांनी पैगाम चे नेते व कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे.”कदम कदम बढाए जा,खुशी के गीत गाये जा” ह्या गीताच्या काही ओळी सांगून त्यांनी मार्मिक पणे आपल्या बोलण्याला विराम दिला.शेवटी सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी आपले म्हणणे पूर्ण केले.कार्यक्रमाची सुरुवात एडव्होकेट मा.कुणाल कांबळे यांच्या प्रस्तावनेने झाली.त्यांनी प्रस्तुत”बहुजन संखेने मोठ्या प्रमाणात असूनही ते समस्सेने वेढलेले का आहेत”या विषयावर स्पष्टीकरण दिले.बहुजनांना बरोबरीने आणने हीच संविधानाची दिशा आहे. आजही आम्ही समस्याग्रस्त का आहोत याचे उत्तर देणे कठीण आहे.गैरबराबरी आजही सूरू आहे.श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे तर गरीब आणखी गरीब होत चालला आहे.याचे कारण म्हणजे आमचे लोक सत्तेमध्ये जाऊन देखील आपल्या अधिकाराचा ऊपयोग करून बहुजन समाजातील लोकांच्या जीवनात अपेक्षित बदल करू शकले नाही.त्यामुळे बहुजनांना जागृत करणे आवश्यक आहे. तेच सर्वसमस्सेचे समाधान आहे.ते कार्य पैगाम द्वारे निरंतर सूरू आहे.ही आनंदाची बाब आहे.या कार्यामुळे व्यक्ती एक चांगला वक्ता,कार्यकर्ता व चांगला मनुष्य बनतो. अशा प्रकारे प्रस्तावनेच्या द्वारे कार्यक्रमाची ऊत्तम सुरूवात करून पुढील वक्त्यांच्या बोलण्याला त्यांनी दिशा दिली.

पैगाम च्या वरीष्ठ कार्यकर्त्या डॉ.मिना अंभोरे यांनी पैगामचे कार्य व ऊद्दीष्टांचा परिचय करून दिला.पैगाम शोषित-पिडीत भारतीयांचे सामाजिक संगठन आहे.ते नाॅन पाॅलिटीकल व नाॅन रिलीजियस असून ते एक सामाजिक संगठन आहे.पैगाम द्वारे समर्थ,सक्षम व निस्वार्थी नेतृत्व व तशाच कार्यकर्त्यांचा संघ विकसित करणे,प्रत्येकामध्ये सन्मानपूर्वक व सार्थक जीवन जगण्याची आस्था निर्माण करणे,फुले-आंबेडकरी विचाराचे अनुसरून करणारी सामाजिक ओळख निर्माण करणे.जाती व्यवस्था नष्ट करून समाजात समता निर्माण करणे.अशा प्रकारे पैगाम च्या कार्य बद्दल अचूक माहिती दिली.त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांना व सदस्यांना पैगाम बाबत अधिक माहिती मिळाली.कार्यक्रमाला विविध ठिकाणाहून उपस्थित झालेल्या विचारवंत व वक्त्यांनी ही आपले विचार मांडले त्यात मा.टि.के.बनसोडे यांनी विषयाला अनुसरून वक्तव्य केले.बहुजन मोठ्या संख्येने असून देखील समस्यांनी ग्रासलेले असल्याचे मूळ कारण म्हणजे इथे हजारो वर्षे बहुजन समाज हा जाती व्यवस्थेचा शिकार झालेला आहे.तेव्हा जाती व्यवस्था नष्ट करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.वर्तमानातील सर्व समस्या या कृत्रिम निर्माण केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मुळ समस्या ही उच्च-निच्चतेची सामाजिक व्यवस्था आहे.ती नष्ट केल्या शिवाय आपणास गत्यंतर नाही.तसेच आपल्या महापुरुषांनी वेळोवेळी मित्र व विरोधी यांची ओळख करून दिली आहे. जसे बुद्धांनी बहुजन हिताय,बहुजन सुखाय चा नारा दिला.म.फुले यांनी शेटजी-भटजी विरूद्ध शुद्रादिअतिशुद्र, छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मण/ ब्राम्हणेतर,बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी ब्राह्मण/क्षत्रिय अशा प्रकारे शत्रू व मित्राची ओळख करून दिल्यामुळे वैचारिक संघर्षाला मोठे बळ मिळाले आहे.जसे की,आजाराच्या परिणामावरती काम करण्या ऐवजी मुळ आजार शोधून त्यावर औषध घेतल्यास मुळ आजार व त्याचे परिणामही नष्ट होतात.त्याच प्रमाणे देशातील बहुजनांची मुळ समस्या जाती व्यवस्था जर नष्ट करण्याचे कार्य आपण केले तर आपल्या सर्व समस्या संपतील असे ते म्हणाले.

मा.लक्ष्मण शिर्के यांनी बहुजन समाजाची ओळख अतिशय महत्त्वाची आहे. मनुस्मृतीवर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये आम्ही गुलाम झालो आहोत. त्यामुळे गुलामीत जगण्यापेक्षा मेलेले बरे! असे ते म्हणाले.नार्वे नावाचा छोटासा देश जेव्हा जर्मनीच्या गुलामी विरुद्ध बंड पुकारतो तेव्हा तो या संघर्षात गुलामी पत्करण्या ऐवजी मरण स्विकारतो.या ऊदाहराणातून स्वातंत्र्य व स्वाभिमान कीती महत्त्वाचा आहे हे त्यांनी पटवून दिले.आमच्या वरती अनेक वेळा आक्रमणे झाली.तरीही आम्ही जागृत होऊ शकलो नाही याचा खेद वाटतो.असे ते म्हणाले.त्यांचा शब्द शब्द विचार करायला लावणारा होता.मा.विजय इंगळे यांनी आज समाजा मध्ये रोटी,कपडा,मकान,शिक्षण व स्वास्थ्य संबंधित समस्या दिसत असल्या तरी त्या जातीपातीच्या व्यवस्थेचा परिणाम मात्र आहे.या व्यवस्थेला नष्ट करायचे असेल तर आपल्यातील अहंकार दूर करावा लागेल.तरच आपण इतरांना जोडू शकतो.असे ते म्हणाले तसेच त्यांनी सदर प्रसंगी एक प्रेरणादायी गीतही सादर केले.त्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.

मा.कविता ठक्कर यांनी इतिहासातील काही गोष्टी च्या माध्यमातून सांगितले की, समस्या आहे तर तीचे कारण आहे.आणि कारण समजले तर समाधान सुद्धा आहे. हा विचार आमच्या पूर्वजांनी 2500 वर्षापुर्वीच सांगून ठेवला आहे. आज बहुजन समाज पशूतूल्य अवस्थेत जीवनयापन करीत आहे.अशा वेळी या अवस्थेतून बाहेर पडण्याचा व मनुष्य बनण्याचा पैगाम हा एकमेव मार्ग मला दिसतो आहे.असे त्या म्हणाल्या.प्रा.आनंद दांडगे यांनी बहुजन समाज म्हणजे एससी,एसटी,ओबीसी व धार्मिक अल्प संख्यांक समाज होय. त्यामध्ये ही शिख,मुस्लिम,ख्रिश्चन आणि बुद्धिष्ट हा समाज होय.अशी बहुजनांची स्पष्ट ओळख करून दिली.बहुजन समाज ईतक्या मोठ्या संख्येने असूनही तो परेशान आहे.या कारणांचा शोध आपण घेतला पाहिजे.आपल्या गुरू आणि संतांनी आपल्याला मानवतेची शिकवण दिली आहे. त्यानुसार आपण वागले पाहिजे असे ते आपल्या भाषणात म्हणाले.

कुर्ला येथून संमेलनास आवर्जून उपस्थित झालेले सामाजिक कार्यकर्ते मा.अनिल लोंढे यांनीही या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले.ते म्हणाले की,आजही जातीयता अस्तित्वात आहे व वेळोवेळी अनेक घटनांमधून आपल्याला ती दिसून येते.हरियाणा मध्ये घडलेल्या सत्य घटनेचे ऊदाहराण देऊन त्यांनी आजही जाती व्यवस्थेमुळे बहुजन समाजातील लोक अपमानित जीवन जगत आहेत.प्रसंगी त्यांना जीवाला मुकावे लागते आहे.त्यामुळे जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे.हा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला.मा.राजू कांबळे म्हणाले की, आपली समस्या जातीपाती आणि वर्णव्यवस्थेची असल्याने आपण आजही मागासलेपणाचे जीवन जगत आहोत.या व्यवस्थेमध्ये आम्हाला माणूस म्हणून मानलेजात नाही.त्यामुळे पैगाम माणसाला माणूस बनविण्यासाठी कार्य करीत आहे.माझ्या मते तेच कार्य महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

एडव्होकेट यशवंत गायकवाड यांनी वेळोवेळी देशात परकीय आक्रमणे झाली. परंतु त्यांच्या विरोधात कोणतेही स्वातंत्र्याचे आंदोलन केल्याचे ऐकण्यात आले नाही.परंतु ईंग्रजी सत्तेच्या विरोधात मात्र स्वातंत्र्याच्या नावाने आंदोलन चालविले गेले याचे नवल वाटले.खरे तर ईंग्रजी सत्तेच्या माध्यमातून बहुजनांवर लादलेली शिक्षण बंदी,शस्त्र बंदी,संपत्ती बंदी उठविण्यात आली व बहुजन समाज हा खर्या अर्थाने स्वतंत्र होत होता त्यामुळे स्वातंत्र्याच्या नावाने चालविलेले आंदोलन हे खोटे आंदोलन असल्याचे दिसून येते. असा इतिहासातील ठराविक घटनांचा उल्लेख त्यांनी यावेळी करून सत्यता समोर आणली.मा.रविंद्र शेजोळे यांनी म.फुलेंच्या विद्येविना मती गेली,मती विना नीती गेली,सर्व अनर्थ अविद्येने केले या ओळींची आठवण करून देत विद्या,ज्ञाण कीती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. केवळ दोन वेळचे जेवणच नव्हे तर मनुष्याला आत्मसन्मान ही महत्त्वाचा आहे आणि शिक्षणाने ती भावना जागृत होते.असा महत्त्वाचा विचार त्यांनी यावेळी मांडला.

        “चौकट”

मा.चंद्रकांत पगारे यांनी प्रथम संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अंबरनाथ-ऊल्हासनगर-कल्याण युनिट चे व विशेष करून एडव्होकेट कुणाल कांबळे व छायाताई देहाडे यांना ऊत्कृष्ट आयोजना बद्दल शुभेच्छा दिल्या.पैगाम हा देणे शिकवतो.आणि जो देतो त्याला मिळते.पैगाम काही संकेत कार्यकर्त्यांना देतो.ईथे आपल्याला काही तयार करून मिळत नाही.तर आपण मेहनत व प्रामाणिक पणे कार्य करता करता आपल्याला खर्या जीवनाचा बोध होतो.हे एका पोपटाच्या गोष्टी मधून त्यांनी पटवून दिले.

वरिष्ठ कार्यकर्ता मा.स्वर्णजीत सिंह यांनी सांगितले की आम्ही जेव्हा पैगाम चा सामाजिक परिवर्तनाचा विचार सांगण्यासाठी लोकांमध्ये जातो.तेव्हा लोकांना तो एक विचार स्वप्ना सारखा वाटतो.त्यांना तो पटवून द्यावा लागतो. फुले आणि बाबासाहेब डॉ.आंबेडकरांचे विचार आम्हाला समजून घेऊन इतरांनाही ते सांगावे लागतील.आज माझा समाज म्हणजे बहुजन समाज आहे हे लक्षात आले आहे.म.फुलेंच्या फाॅर्मुल्यामुळे शत्रू हे केवळ देशाच्या सीमेवरच नाहीत तर ते आमच्या मध्ये ही आहेत.हे माहीत झाल्यामुळे आमचा संघर्ष योग्य दिशेने चालला आहे याचे समाधान वाटते.असे ते म्हणाले.

ऊल्हासनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संचार या ई दैनिकाचे संपादक मा.जावळे साहेब प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात पैगाम कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले.पूढे ते म्हणाले की,महापुरुष हे एकटेच होते.तरीही त्यांनी क्रांतीकारी कार्य करून समाजात मोठा बदल घडवून आणला.आपण आज मोठ्या संख्येने आहोत.त्यामुळे सामाजिक क्रांती निश्चितच होणार आहे.त्यांनी एक आंधळा व राजा यांची गोष्ट सांगून राज्यकर्त्यांची भिकारी मानसिकता लक्षात आणून दिली.त्यामुळे त्यांच्यावर विसंबून न राहता आपण सामाजिक परिवर्तन कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.सदर संमेलनास एडव्होकेट प्रज्ञा कांबळे,शोभा गवळी,मिरा दांडगे यांची तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची ऊपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.छायाताई देहाडे यांनी ऊत्कृष्ट केले.प्रा.आनंद दांडगे यानी सर्वाचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.सदर कार्यक्रम अंबरनाथ कल्याण युनिट च्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेऊन यशस्वी केला.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!