(नागपूर)दिं.५प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अधिवेशन आणि पक्षाचे संस्थापक नेते तथा राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोप दि ३० सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथे आयोजित करण्याचा निर्णय पक्षाच्या नागपूर येथील आमदार निवास येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ह्या बैठकीत सभासद नोंदणी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला अधिवेशनापर्यंत सभासद नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे एक लाख सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्याकरिता जिल्हानिहाय तसेच प्रदेश निहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

बैठकीला पक्षाचे सरचिटणीस मा उत्तमराव गवई,कोषाध्यक्ष सत्यजित खोब्रागडे,प्रवक्ते डॉ.एन.व्हि ढोके,सहप्रवक्ते प्रशिक आनंद,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे,कार्याध्यक्ष डॉ.देवेश कांबळे,सरचिटणीस जीवन बागडे,चिटणीस प्रा.अशोक ढोले, उपाध्यक्ष सी.एम.रामटेके,विनोद साळवी,मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,नागपूर प्रदेश अध्यक्ष राजू भाऊ गजभिये,सरचिटणीस आनंद वानखेडे, अकोला जिल्हा अध्यक्ष दिगंबर वाकोडे, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष संजीवकुमार ईखारे,चंद्रपूर शहर अध्यक्ष मुन्ना भाऊ खोब्रागडे, पंजाबराव रामटेके,पश्चिम विदर्भ अध्यक्ष सुरेश दहिकर,वर्धा जिल्हा अध्यक्ष विनायक ताकसांडे,माजी नगरसेवक सिद्धार्थ रामटेके,रंजना ताई वासेकर, सुदर्शन मुन व इतर मान्यवर उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!