महाराष्ट्र ग्रामीण
Trending

बीडच्या विमानतळाला निधी,परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी व आष्टी ते बीड रेल्वे मार्ग अखेरच्या टप्प्यात.

जिल्ह्यचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री,मा.अजितदादा पवार यांनी व्हीसी द्वारे बैठकीत घेतला आढावा.

(बीड)दिं.२७प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

बीडच्या नियोजित विमानतळाच्या जागेसह अन्य दोन विषयांच्या संदर्भाने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी विकासकामांचा आढावा घेतला.बीड तालुक्यातील नियोजित विमानतळ जागेसाठी शासकीय व खासगी अशी एकूण ३०८ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा व्हीसीद्वारे पालकमंत्री पवार यांनी २५ जून रोजी घेतला.या बैठकीस सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या तीन महत्त्वाच्या कामाची सद्य:स्थिती नमूद केली.बीड येथील नियोजित विमानतळासाठी मौजे कामखेडा,दगडी शहाजानपूर व आहेर चिंचोली या तीन गावांतील ११७.०४ हेक्टर शासकीय जमीन व १९१.२८ हेक्टर खासगी अशी एकूण ३०८.३२ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे.विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी स्वत: जागेची पाहणी केली आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळासाठीची जागा सुयोग्य आहे का ? हे तपासण्यासाठी प्री-फेसिबिलिटी स्टडीची माहिती मागवून घेत याबाबतच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुपये ४०.३२ लाख निधी दिला असल्याचे सांगण्यात आले.तसेच रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने ट्रॅक्शन सबस्टेशन आष्टी येथील कामाचा आढावा घेण्यात आला.सदर रेल्वे लाईनवरील २३ पैकी १७ मनोऱ्यांचे काम महापारेषण मार्फत करण्यात आले आहे.उर्वरित चार मनोऱ्यांचे काम प्रगतिपथवार असून,१५ जुलैपर्यंत सदरील काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्ताव सादरपरळी तालुक्यातील लोणी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी होत आहे. त्यासाठी लोणी येथील ८.८० हेक्टर व परळी येथे २० हेक्टर अशी २८.८० हेक्टर जमिनीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या जागेची पाहणी पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.ही जमीन प्रदान करण्यासाठी आवश्यक असणारे ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अभिप्रायसुद्धा शासनाकडे सादर केला आहे.ही जमीन विद्यापीठाकडे वर्ग झाल्यानंतर सदरील ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी सुरू होईल.

मोजणीच्या तारखा निश्चितअहमदनगर-बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामांमध्ये प्रामुख्याने रेल्वे विभागाकडून माजलगाव,बीड व परळी उपविभागामध्ये एकूण १३ गावांमध्ये नव्या क्षेत्राचे भूसंपादनाचे प्रस्तावांतर्गत संयुक्त मोजणीचा तारखा जून महिन्याच्या शेवटच्या व जुलै महिन्याचे पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी नमूद केले.त्याअनुषंगाने सदर मोजणीची कार्यवाही नेमलेल्या तारखेस पूर्ण करावी व त्यानंतर अंतिम निवाड्याची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!