(उल्हासनगर)दिं.१४प्रतिनिधी-राहुल हांडोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

भारतीय बौद्ध महासभा त्यागमुर्ती रमाई शाखा पांच पांडव कॉलनी ब्राह्मणपाडा उल्हासनगर ४ येथे चाळ नंबर ७,८येथील उपासक उपासिका व सिद्धार्थ बुद्ध विहार शाखा उल्हासनगर 5 येथील सर्व पदाधिकारी समता सैनिक दल सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयुनी सुमनताई साळवे ह्या होत्या तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदरणीय लक्ष्मण पी मोरे महाराष्ट्र राज्य हिशोब तपासनीस भारतीय बौद्ध महासभा यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाची पूजा व त्रिशरण पंचशील,बुद्ध पूजा,भीम स्तुती भीम स्मरण करून स्वागत गीत आयुनि विमलताई शिनगारे यांनी गायले.तसेच कॉलनीतील आराध्य बर्वे,शर्विल खरात,अंतरा संगारे,पवन सुतार या छोट्या मंडळींनी नृत्य कला व भाषणे देऊन सर्वांची मने जिंकली.

आयुनि वैशाली शिनगारे,शुभांगी साळवे, निंबाजी वाघ यांनी भीम गीते व कविता सादरीकरण केले.शाखेचे पदाधिकारी सचिन शिनगारे,संजय जाधव,सुमित्रा गवळी,सुनील गवळी,विमल वाघमारे, अनिल सहारे,बाळू कांबळे,श्रुतिका जाधव,निर्मला मोरे, या समता सैनिक यांनी आदर्शाना सलामी दिली,तसेच शरद बर्वे,कीर्ती बर्वे,अर्चना खरात,राजेश पोहेकर,सुनीता पोहेकर,कांचन जावळे,सुनील जावळे, पूनम सुतार,विशाल निर्भवने,रीना निभावणे, रीना सरकटे,कांबळे साहेब,पूजा संगारे,विजय संगारे,किसन वाघमारे,राजेंद्र दुशिंग,सुरेखा दुशिंग,सिंपल राजभर, ज्योती घुले,रिटाताई गिरासे,यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!