(मुंबई)प्रतिनिधी,संतोष क्षेत्रे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
दादरच्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी नियोजित उत्तुंग पुतळ्याची २५ फूट उंचीची तयार करण्यात आलेली नमुना प्रतिकृती सदोष ठरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तोच पुतळा पूर्णत्वाकडे नेण्याचा आणि लादण्याचा प्रयत्न कदापिही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समिती ची सोमवारी स्थापना करण्यात करण्यात आली आहे.मुंबईच्या फोर्ट भागातील समाजवादी पार्टीच्या कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या एका बैठकीत या समितीची एकमताने स्थापना झाली.
या बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड.डॉ.सुरेश माने,दलित पँथरचे नेते सुरेश केदारे,ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने,ओबीसी नेते राजाराम पाटील,लोकजनशक्ती पार्टीचे नेते रवी गरुड,समाजवादी पार्टीचे महासचिव राहुल गायकवाड,काँग्रेस नेते गणेश कांबळे,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सुबोध मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते उत्तमराव गायकवाड, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे,रिपब्लिकन सेनेचे कामगार नेते रमेश जाधव,मुस्लिम ब्रिगेडचे नेते आफिफ दफेदार,ॲड.प्रफुल्ल सरोदे,प्रसेनजित कांबळे,सतीश डोंगरे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सोनावणे,पंकज चाळके, गौतम कांबळे,मिथुन कांबळे,विजय भगवान कांबळे,प्रकाश मेश्राम,संजय जगताप,
विनोद ढोके,आबा मुळीक,अशोक पवार,सचिन गायकवाड,भिकाजी खैरनार,कुणाल लोंढे,सुधीर मकासरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या समितीची पुढील बैठक १४ फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विस्तृत चर्चेसाठी भेट घेणार आहे.